Weather Update : दक्षिण कोकण, घाटमाथ्यावर वाढणार पावसाचा जोर

मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : मॉन्सून (Monsoon) सक्रिय झाल्याने राज्यात पावसाला (Rain) सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाने (Heavy rain With Lightning) हजेरी लावली आहे. आज (ता. ६) दक्षिण कोकण व लगतच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) (Heavy Rain Orange Alert) देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Wheat prices: गव्हाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारवर दबाव

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. राजस्थानच्या बिकानेरपासून, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. झारखंड आणि परिसरावर, कर्नाटक आणि परिसरावर तसेच राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहेत. दक्षिण भारतात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती (शेअर झोन) कायम आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

Weather Update
Cotton Production:हरियाणातील कापूस उत्पादन घटण्याची शक्यता

आज (ता. ६) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा ( ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर.

.....

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

.........

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com