Crop Insurance : पीक नुकसानीची माहिती ७२ तासात विमा कंपनीस कळवा

सततचा पाऊस यांसह अतिवृष्टीमुळे आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीस कळविणे आवश्यक असल्याची, सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केली आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

जालना : सततचा पाऊस यांसह अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) आपत्तीमुळे (Natural Calamity) झालेल्या पीक नुकसानीची (Heavy Rain Crop Damage) माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीस (Crop Damage Intimation) कळविणे आवश्यक असल्याची, सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केली आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा मिळण्यासाठी ‘स्वाभिमानी’ची बोंबा-बोंब

यासंदर्भात कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, जालना जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये काही महसूल मंडळामध्ये भागात सतत पाऊस तर काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२२ जालना जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.

Crop Insurance
Crop Insurance : नुकसानग्रस्तांना २५ टक्के पीकविमा अग्रिम द्या

प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्‍चित करण्यात येते. पुराचे पाणी शिरून दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे ७२ तासांच्या आत नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. किंवा विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती कंपनीस देणे आवश्यक आहे.

त्यासाठी पीकविमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance हे ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी. किंवा एचडीएफसी इरगो विमा कंपनीच्या १८०० २६६ ०७०० या टोल फ्री क्रमांकावर किंवा विमा कंपनीचे ‘पिहू whatsapp bot’ (७३०४५२४८८८) याद्वारे नुकसानीची माहिती द्यावी.

तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमाद्वारे विमा कंपनीस माहिती देऊ न शकल्यास विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी किंवा जिल्हा प्रतिनिधी, संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेकडे प्रत्यक्ष २ प्रतीत अर्ज देऊन एका प्रतीवर पोहोच घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com