Election News : नगरला पाटबंधारे कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीची चुरस

सध्या सुरू असलेल्या सदर पतसंस्थेच्या निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.
 Election
ElectionAgrowon

Nagar Election News : नगर जिल्हा पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थेचा पंचवार्षिक निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झालेली असून, १८ मार्च रोजी मतदान होत आहे.

त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सदर पतसंस्थेच्या निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. विद्यमान संचालकांचा सहकार पॅनेल व विकास पॅनेल असे एकमेकांसमोर उभे ठाकले असून विकास पॅनेलने लोकप्रियता मिळवली आहे.

नगर जिल्हा पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी पतसंस्थेत सत्ताधारी गटातील विद्यमान संचालक शांताराम आवारी यांनी त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांसह विकास पॅनेलमध्ये प्रवेश केला.

 Election
Irrigation Department : पाणीचोरांचा पाटबंधारेच्या सूचनेला ठेंगा

संगमनेर, अकोला या भागांत विकास पॅनेलसाठी मोठी जमेची बाजू समजली जाते. विकास पॅनेलचे अध्यक्ष किशोर गांगुर्डे, मार्गदर्शक दत्तात्रेय गडाख, सर्जेराव ठोंबरे, परदेशी, बाळासाहेब गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विशाल सरोदे, शेरकर, शेटे, कवडे, राशीनकर, सय्यद, अर्चना गायकवाड, अमृता पोळ, विजया शिंदे, घाटविसावे आदी उपस्थित होते. १३५ उमेदवारांनी आपले भवितव्य अजमावण्यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत.

६ मार्चपर्यंत अर्ज परत घेण्याची मुदत आहे. १८ मार्च रोजी मतदान होणार असून, १९ मार्च रोजी निकाल लागणार आहे. दोन्ही पॅनेलच्या वतीने आपापल्या परीने वेगवेगळ्या क्लृप्त्या करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

या निवडणुकीत १४८८ मतदार असून पाचशे कोटीच्या जवळपास वार्षिक उलाढाल आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com