राज्यात माॅन्सून सक्रिय झाला?

नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने रविवारी राज्य व्यापले. सोमवारी कोकणासह काही भागांत पावसाने हजेरी लावली. पुढील काही दिवसांत राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
राज्यात माॅन्सून सक्रिय झाला?
Monsoon UpdateAgrowon

नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनने (Monsoon) रविवारी (ता.१९) संपूर्ण राज्य व्यापले. (Monsoon Covered Maharashtra) सोमवारीही (ता.२०) माॅन्सूनने चाल कायम ठेवत अनेक राज्यांत प्रगती (Monsoon Progress) केली. राज्यातही अनेक भागांत ढगाळ हवामान (Cloudy Weather) होते, पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तसेच हवामान विभागाने (Weather Department) कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज (Heavy Rain Prediction) हवामान विभागाने व्यक्त केला.

माॅन्सूनने रविवारी राज्याचा उर्वरित भाग व्यापत पुढे चाल केली. सोमवारी माॅन्सूने मध्य प्रदेशचा बहुतेक व्यापत संपूर्ण छत्तीगड आणि आंध्र प्रदेश राज्य व्यापले. बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, संपूर्ण ओडिशा आणि पश्चिम बंगाल व्यापत माॅन्सूनने सोमवारी मोठी झेप घेतली. झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांतही माॅन्सूनने प्रगती केली. पोरबंदर, बडोदा, शिवपुरी, रेवा या भागांत माॅन्सूनची दिशा आहे.

संपूर्ण राज्य माॅन्सूनने व्यापले, तरी पावसाची दडी होती. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत. राज्यातील काही भागांत आता माॅन्सून सक्रिया झाला असून पाऊस पडत आहे. कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सोमवारी पावसाच्या सरी झाल्या. तसेच २३ आणि २४ जूनला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल. तसेच कोकण आणि गोवा राज्यात पुढील पाच दिवसांत अतिजोरदार पाऊस पडेल. तसेच कोकण किनारपट्टी भागात २२ आणि २३ जूनला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने जाहिर केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com