
अकोला ः उतिसंवर्धित रोपे व बियाणे निर्मितीसाठी ईश्वेद बायोटेक व इस्रायली कंपनीमध्ये करार झाला असून, रोगमुक्त व उत्पादनक्षम वाण निर्माण केले जातील, अशी माहिती ईश्वेदचे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी दिली.
सिंदखेडराजा येथे ईश्वेद बायोटेकचे मुख्यालय असून आधुनिक उतिसंवर्धित तंत्रज्ञानाने फळबाग व वनशेती रोपे विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. यात आता आणखी भर पडली असून, केळी या पिकांमध्ये रोगमुक्त आणि चांगले उत्पादन देणारे वाण विकसित करण्यासाठी इस्राईलच्या कंपनीसोबत ईश्वेद बायोटेकने करार केला आहे. या करारांतर्गत आता उतिसंवर्धित रोपे व बियाणे निर्माण केले जाईल.
सोबतच इस्रायली तंत्रज्ञानाची सुद्धा देवाण-घेवाण केली जाणार आहे. हा करार ईश्वेद आणि शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे, असेही श्री. वायाळ म्हणाले.
सिंदखेडराजा तालुक्यातील माळसावरगाव येथे ईश्वेद बायोटेकने उतिसंवर्धित रोपे, बियाणे क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी केळीसह पेरू, डाळिंब, आंबा, जांभूळ, किवी, अंजीर, सीताफळाची रोपे उपलब्ध करून दिली आहेत.
फळबाग, भाजीपाला या क्षेत्रात शेतकऱ्यांना आधुनिकतेची कास धरायला लावत दर्जेदार रोपे उपलब्ध करून दिली. इस्राईलची कंपनी व ईश्वेदमध्ये शुक्रवारी (ता. १६) करार करण्यात आला. इस्राईलमधील जिनोसर ॲग्रो कंपनीचे सीईओ ईनॉन, वरिष्ठ शास्त्रज्ञ नफाफ, ईश्वेदचे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांची यावेळी उपस्थिती होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.