
Onion Market Update राज्यात कांद्याच्या दर (Onion Rate) कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. याशिवाय अनेक शेतीमालाचे दर पडले आहेत. त्यातच अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले की, कांदा उत्पादनाचा खर्च आणि मिळणारा दर पाहता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. अशावेळी राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रति किलो मदत द्यावी.
याशिवाय केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाफेडने निर्यातीसंदर्भातील ठोस कार्यक्रम राबविला पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या निर्यातील बंधन असता कामा नये. दोन दिवसांनी संसदेचे अधिवेशन सुरू होणार तेथे हा प्रश्न मांडण्यात येईल.
नाफेडची खरेदी होतच नाही
कांदा दर कोसळल्याने राज्य सरकारने बाजार समित्यांमध्ये नाफेडमार्फत कांदा खरेदीची घोषणा केली. मात्र, नाफेडची कांदा खरेदी होतच नाही, असे पवार यांनी सांगितले.
नाफेडने मार्केटमध्ये उतरून खरेदी केली असे चित्र दिसत नाही. नाफेडने शेतकऱ्यांचा कांदा निदान १२०० रुपयांनी खरेदी करावा, अशी पारनेरच्या शेतकऱ्यांनी केल्याचेही पवार म्हणाले.
मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान सरकारने कांदा उत्पादकांसाठी काहीना काही पाऊले उचलली आहेत. परंतु, महाराष्ट्र सरकारमध्ये केवळ चर्चाच सुरू आहे.
शेतकऱ्यांकडून कांद्याला अनुदान देण्याची मागणी होत आहे. यावर म्हणाले की, सध्या शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे. त्याला अनुदान द्या, खरेदी करा किंवा आणखी काही उपाययोजना करा.
मात्र, शेतकऱ्याला मदत करा. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदतीसाठी राज्य सरकारशी बोलणार आहे.
शेतकऱ्याची जात विचारणे चुकीचे
आजपर्यंत या देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांना जात विचारायचा प्रघात नव्हता. खतांसाठी जर शेतकऱ्यांना जात विचारत असतील, तर हे अत्यंत चुकीचे आहे. याची अधिक माहिती आम्ही घेत आहोत, असेही पवार म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.