Forest Fire : वणवे पेटविणे धोकादायक, अन्‌ कायदेशीर गुन्हाही!

उन्हाळा सुरू झाला की, पावसाळ्यानंतर चांगले गवत उगवावे यासाठी जंगलात वणवा लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात. जंगलात गवत पेटवणे हे पर्यावरणाला धोकादायक आणि कायदेशीर गुन्हा आहे.
Forest Fire
Forest Fire Agrowon

फुलवडे, ता.आंबेगाव : उन्हाळा सुरू झाला की, पावसाळ्यानंतर चांगले गवत (Grass) उगवावे यासाठी जंगलात वणवा (Forest Fire) लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात. जंगलात गवत पेटवणे हे पर्यावरणाला (Environment) धोकादायक आणि कायदेशीर गुन्हा आहे. जंगलातील जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. वन विभागाकडून (Forest Department) जंगलातील वणवे थांबविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती घोडेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे यांनी दिली.

Forest Fire
Nashik Bus Fire : बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

गैरसमजातून आग लावल्यामुळे जंगलावर आधारित रोजगार असलेल्या वनसंपदेचे नुकसान होऊन, रोजगार देखील कमी होत आहे. त्यामुळे वणवे थांबविण्यासाठी गावागावात जाऊन वनकर्मचारी प्रबोधन करत आहे. प्रबोधनामध्ये वणव्यांचे धोके, होणारे नुकसान आणि कायदेशीर गुन्ह्यांबाबत जनजागृती करत आहेत.

Forest Fire
Forest Department : कातळशिल्प संशोधनासाठी वन विभागाकडून मदत

कायदा काय सांगतो...

जंगल क्षेत्र व रोपण क्षेत्रालगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बांध पेटवताना जवळच्या वन अधिकाऱ्यांना कळविल्याशिवाय विस्तव व आग पेटवू नये. तसे न करता सावधगिरीची उपाययोजना न करता विस्तव पेटविल्यास त्यास भारतीय वन अधिनियम १९२७ (१) (ब) व भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार एक वर्ष कैद, ५ हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा व कोर्ट निर्णय देईल त्याप्रमाणे जंगलाची नुकसान भरपाई भरावी लागेल.

अशा व्यक्तीची माहिती द्या...

बांध पेटविणे व राब भाजणीसाठी पेटवलेली आग पूर्णपणे विझविल्याशिवाय आपले मालकी क्षेत्र सोडून शेतकऱ्यांनी कुठेही जाऊ नये. आपल्या परिसरातील जंगल क्षेत्रात आग लागल्याचे निदर्शनास आल्यास वन अधिकाऱ्यांना जरूर ती मदत करावी. वणवा, आग लावताना एखादी व्यक्ती आढळल्यास सदर व्यक्तीचे नाव कार्यालयास तत्काळ कळवावे, माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही गारगोटे यांनी सांगितले.

सर्व ग्रामस्थांनी जंगल संपत्तीचे संरक्षण व संवर्धन होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कानसे वनपरिमंडळ अधिकारी पी. पी. लांघी, गंगापूर बुद्रुकचे वनरक्षक ए. एच. घोडे, फुलवडेचे वनरक्षक एन. टी. दळवी, कानसेचे वनरक्षक एस. आर. सुपे गावागावात जाऊन करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com