‘कृषी संजीवनी’त अधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे बंधनकारक

कृषी आयुक्तालयाच्या सूचना
‘कृषी संजीवनी’त अधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे बंधनकारक
Government SchemeAgrowon

पुणे ः राज्यात २५ जूनपासून सुरू होत असलेल्या कृषी संजीवनी मोहिमेत (Krushi Sanjivani Scheme) हजारो गावांमध्ये विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान एका गावच्या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी सूचना कृषी आयुक्तालयाने (Agriculture Commissionerate) केली आहेत.

२५ जून ते १ जुलै या दरम्यान कृषी संजीवनी मोहीम राबविली जाईल. विभागीय कृषी सहसंचालक (जेडीए), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) आणि जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्याने (एडीओ) कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रांशी समन्वय करावा. तसेच कृषी सहायकांना तारखेनिहाय मोहिमेचे नियोजन करून द्यावे, असे सूचित करण्यात आलेले आहे.

एसएओ, एडीओ आणि आत्माच्या प्रकल्प संचालकाने रोज एका गावाला तर उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्याने किमान दोन गावांच्या मोहिमेत सहभागी व्हावे, अशा सूचना कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी राज्यभर दिल्या आहेत. एक जुलै रोजी स्व. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे, असे संचालकांचे म्हणणे आहे.

कृषी सहायक व मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडून ग्रामस्तरावरील मोहिमेचा आराखडा तयार केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कृषी आयुक्तालयाने नेमलेल्या पालक उपसंचालकाला या मोहिमेचा आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोहिमेच्या अखत्यारित प्रत्येक दिवशी साजरे केले जाणारे कार्यक्रम असे ः २५ जून - तंत्रज्ञान प्रसार व मूल्यसाखळी बळकटीकरण दिन, २६ जून - पौष्टिक तृणधान्य दिन, २७ जून - महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन, २८ जून खत बचत दिन, २९ जून - प्रगतशील शेतकरी संवाद दिन, ३० जून - शेती पूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिन, १ जुलै - कृषी दिन.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com