Agriculture Processing : नाशीवंत शेतीमालाच्या प्रक्रियेवर भर देणे गरजेचे

केंद्रिय राज्यमंत्री डॉ. पवार : जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाला सुरुवात
Agriculture Processing
Agriculture ProcessingAgrowon

नाशिक : नाशिक हा मुंबईसारख्या शहरास भाजीपालापुरवठा करणारा जिल्हा असून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (Farmer Producer Company) माध्यमातून बाजाराभिमुख व्यवसाय करण्याची सुरुवातदेखील जिल्ह्यात करण्यात येत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे (Processing) लक्ष देऊन नाशीवंत शेतीमालाची प्रक्रिया करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्यात येऊन शेतकऱ्यांनी लहान प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

Agriculture Processing
Grapes : द्राक्ष बागेत रोगनियंत्रणाकडे लक्ष देणे गरजेचे

कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. भारती पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या. या वेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, आमदार सीमा हिरे, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा कृषी अधिकारी रमेश‍ शिंदे, आदर्श महिला शेतकरी मनीषा इंगळे यांच्यासह कृषी विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Agriculture Processing
Wheat Irrigation Management : या अवस्थेत गहू पिकाला पाणी देणे गरजेचे

शेतीमध्ये कुटुंबातील महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना कृषी योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे धोरण शासनाने अंगीकारले आहे. त्याचबरोबर घरातील महिलांचे नाव शेतीच्या ७/१२ उताऱ्यावर असल्यास लक्ष्मी योजनेचा लाभ महिला शेतकऱ्यांना घेता येणार आहे. शेतीमध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी या वेळी सांगितले.

या शेतकऱ्यांचा झाला सन्मान

विलास गायकवाड, रामदास पोटींदे, सुगंधा भोये, मोतिराम भांगरे, रामनाथ बोरसे, नवनाथ बोडके, संजय झनकर, कोंडाजी पोरजे, श्यामराव मोगल, सुनील बोरस्ते, सिद्धार्थ केदारे, नंदकिशोर मोहिते, योगेश ईपर, नितीन कोटमे, सुनील भिसे, अमित गिते, तानाजी पवार, भूषण निकम, सुनील खांदवे, श्याम गायकवाड, सागर जाधव, विजय पाटील, विलास पाडवी, जयप्रकाश महाले, मनीषा इंगळे, शुभम जाधव, दीपक गुंजाळ, दादाभाऊ दाभाडे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com