Modern Agriculture : शेतीमध्ये आधुनिकता रुजविणे गरजेचे

शेतीचे उत्पादन वाढविणे, आपत्कालीन परिस्थिती ओढविल्यावर वेळेत नुकसानभरपाई मिळणे आणि आधुनिक बाबींचा वापर करून शेतीचे वृद्धीकरण करणे आज गरजेचे आहे.
Shivraj Singh Chauhan
Shivraj Singh ChauhanAgrowon

नागपूर : शेतीचे उत्पादन (Agriculture Production) वाढविणे, आपत्कालीन परिस्थिती ओढविल्यावर वेळेत नुकसानभरपाई (Crop Damage Compensation) मिळणे आणि आधुनिक बाबींचा वापर करून शेतीचे वृद्धीकरण करणे आज गरजेचे आहे. आधुनिक शेतीचा अवलंब केल्याने मध्य प्रदेशचा कृषी विकास दर (Agriculture Development Rate) गेल्या १२ वर्षांपासून १८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यासाठी फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आपण आधुनिक शेतीकडे वळायला हवे, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले.

ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. दाभा येथील पीडीकेव्ही मैदानावर आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते.

Shivraj Singh Chauhan
Modern Agriculture : प्रशिक्षणांती किफायतशीर शेती

तर मंचावर पीडीकेव्हीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, अॅग्रोव्हिजनचे सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, माजी खासदार विकास महात्मे, आमदार प्रवीण दटके, ॲग्रोव्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, संघटन सचिव रमेश मानकर, रवी बोरटकर,मत्स्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर, फाउंडेशनचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. ‘भविष्यातील शेती : अन्न, चारा आणि इंधन’ ही यंदाच्या चार दिवसीय अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाची संकल्पना आहे.

गडकरींबद्दल बोलताना शिवराजसिंह चव्हाण म्हणाले, नितीन गडकरींनी अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन आपण अवलंबले पाहिजे. संपन्न, समृद्ध आणि शक्तिशाली भारत निर्माण करण्यात नितीन गडकरी यांचा हात आहे. त्यांनी अद्भुत काम केले आहे.

Shivraj Singh Chauhan
Modern Agriculture : व्यवस्थापनातील सुधारणांद्वारे शेतीत जपली गुणवत्ता

गडकरींच्या मार्गदर्शनात सुरू झालेले हे प्रदर्शन शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्याचे काम करीत आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ते तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य करीत आहेत. या प्रयोगाचा शेतकऱ्यांचा तर फायदा होतोच आहे. सोबत पर्यावरणासह पृथ्वीवर राहण्यालायक वातावरणाची निर्मितीसुद्धा यातून होते आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रेणुका देशकर यांनी केले.

नागपूरमध्ये देशातील पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने सुरू करण्याचा मानस आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या याच मैदानावर ते उभारण्यात येत असून १५० कोटींचा आराखडा आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी यासाठी मदतीचे आश्वासन दिले आहे. पुढील ॲग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या आधी या कार्याचा प्रारंभ नक्कीच करू. विदर्भाला आपणास सुखी, समृद्ध बनवायचे आहे. त्याकरिता सामूहिक प्रयत्न हवे.
नितीन गडकरी, अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक व केंद्रीय मंत्री

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com