सहसंचालक पदोन्नती यादीत बदल झाल्याचे उघड

कृषी विभागाच्या बदल्या व बढत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचे लपून राहिलेले नाही. या घोडेबाजाराचे सूत्रधार राजकीय नेते असतात.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon

पुणे ः राज्याच्या कृषी विभागात (Agriculture Department) महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या सहसंचालक (Joint Director) पदाच्या आठ जागांवर झालेल्या बढती प्रक्रियेत एका राजकीय नेत्याने हस्तक्षेप केला. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांना ऐनवेळी बदलण्यात आले, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

Department Of Agriculture
Cotton : कपाशीचे लागवड क्षेत्र गतवर्षीपेक्षा वाढले

कृषी विभागाच्या बदल्या व बढत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होत असल्याचे लपून राहिलेले नाही. या घोडेबाजाराचे सूत्रधार राजकीय नेते असतात. मात्र, सध्या राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही. त्यामुळे घोडेबाजार न होता सहसंचालकांच्या बढत्या व नियुक्त्या पारदर्शकपणे होतील, अशी अटकळ प्रशासनातील अधिकाऱ्यांची होती. तथापि, बढत्यांची अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी राजकीय हस्तक्षेप झालाच. प्रशासनाने सूचविलेल्या मूळ यादीतील नावे बदलण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे कृषी विभागातील अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.

Department Of Agriculture
Seed : घरचे बियाणे वापरल्याने वाशीम जिल्ह्यात वाचले ४० ते ४२ कोटी

राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) गेल्या काही दिवसांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होते. मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्यामुळे पदोन्नती होण्याची शक्यता नसल्याचे या एसएओंना वाटत होते. पंरतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदोन्नत्यांचा प्रश्न निकाली लावण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे पदोन्नत्या झाल्या; पण मोठ्या प्रमाणात संशयास्पद फेरबदलही झाला. एका जिल्हा अधीक्षकाच्या म्हणण्यानुसार, ‘‘मुख्यमंत्री कार्यालयात कृषी विभागाकडून बढत्यांची व नियुक्त्यांची यादी जाण्यापूर्वीच राजकीय लॉबीने खटपटी सुरू केल्या होत्या. दोन अधिकाऱ्यांना मर्जीप्रमाणे पदे देण्याचा आग्रह एका राजकीय नेत्याने मुख्यमंत्र्यांकडे धरला व त्यात यशही आले. त्यामुळे प्रशासनाने पाठवलेल्या यादीत मुख्यमंत्री कार्यालयातफेरबदल झाले. मुख्यमंत्र्यांचे अधिकार अंतिम असल्यामुळे अधिकारीही गप्प बसले आहेत.’’

मलईदार पद रिक्त ठेवले

कृषी सहसंचालकपदाच्या राज्यभरातील जागांमध्ये ठाण्याचे पद मलईदार समजले जाते. ठाणे काबीज करण्यासाठी एक अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार मोर्चेबांधणी करीत होता. मात्र, एका राजकीय नेत्याची वजन वापरून सदर पद आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यासाठी रिक्त ठेवण्यास सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने पदोन्नतीची मंजूर यादी पाठवली असता त्यात ठाण्याच्या नावासमोर फुली मारली गेली, असे प्रशासनातून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com