जमिनीच्या वादातून पुतण्यानेच केला काकाचा खून

जायखेडा पोलिसांनी मुख्य आरोपी सुजित सुनील भामरे (वय २९) याला अटक केली असून त्यानेच रमेश भामरे यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
लाचखोर तलाठ्यास कारावास
लाचखोर तलाठ्यास कारावासAgrowon

सकाळ वृत्तसेवा
सटाणा, जि. नाशिक : पिंपळकोठे (ता. बागलाण) येथील प्राथमिक शिक्षक रमेश शिवराम भामरे यांचा मृत्यू अपघाती नसून जमिनीच्या वादातून सख्या पुतण्यानेच त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने बागलाण तालुक्यातील खळबळ उडाली आहे. जायखेडा पोलिसांनी मुख्य आरोपी सुजित सुनील भामरे (वय २९) (Sunil Bhamre ) याला अटक केली असून त्यानेच रमेश भामरे यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

लाचखोर तलाठ्यास कारावास
सरकारने लोकशाहीचा खून केला : विरोधकांचा आरोप

शनिवारी (ता. १२) अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शिक्षक रमेश भामरे यांचा मृत्यू झाल्याची जायखेडा पोलिसात नोंद झाली होती; मात्र हा अपघात नसून घातपात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्याने जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी याकडे लक्ष केंद्रित केले असता त्यांना घटनाक्रम संशयित असल्याचे वाटले. त्यानंतर चौकशीत मृत रमेश भामरे यांचा पुतण्या सुजीत भामरे यानेच भामरे यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिली. भामरे जखमी झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावर हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याचा संशय पारधींना आला.

लाचखोर तलाठ्यास कारावास
जमिनीच्या आरोग्यासाठी गाय वाचविणे आवश्यक

दरम्यान, शनिवारी अपघातानंतर जायखेडा पोलिसांना मागील अनेक वर्षांपासून काका आणि पुतण्याचे वाद असल्याची माहिती मिळाली होती. मृत रमेश भामरे यांच्या शरीरावर असलेल्या जखमादेखील संशयास्पद असल्याचे पोलिसांना लक्षात आल्याने भामरे यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा पोलिस साध्या गणवेशात बारकाईने लक्ष ठेवून होते.

या सर्व घटनाक्रमात पोलिसांना मृत भामरे यांचा पुतण्या सुजीत भामरे याच्यावर दाट संशय आला. पोलिसांनी सुजीत भामरे याच्या मोबाइलची कॉल डिटेल्स तपासून अपघात घडल्यानंतर तो कोणाशी फोनवर बोलला याची सखोल चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे तपासात निष्पन्न झाले आहेत. अपघाताच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका शेतात अपघाताला कारणीभूत ठरलेले ट्रॅक्टरदेखील मिळून आला.

सहायक पोलिस निरीक्षक यांनी सुजीत भामरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर सुजीतनेच काका रमेश भामरे यांना ट्रॅक्टरने धडक दिल्याचे त्या नंतर एका हत्याराच्या सहायाने त्यांचा खून केल्याची कबुली दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com