Water Management : गवत लागवडीतून करावे जलनियोजन ः डॉ. सिंह

Water Conservation : तीन वर्षात संपूर्ण गावची जलभूगर्भपातळी तीन मीटरने वाढवून गावात कुऱ्हाडबंदी तसेच गावातील धार्मिक वर्गण्या बंद करण्याचे मोठे काम केंदूर (ता. शिरूर, जि.पुणे) येथे झाले आहे.
Dr. Rajendra Singh
Dr. Rajendra SinghAgrowon

Pune News : केंदूर (ता. शिरूर) येथील पिंपळखोरीसह चार शासनाच्या तलावांच्या भूगर्भातून जलप्रवाह हा गावच्या ३५०० हेक्टर परिसरात पोहचला. त्याचा लाभ घेण्याचे काम गावातील आबालवृद्धांनी केल्याने गावची जलपातळी तीन मीटरने वाढली आहे.

या पुढील काळात गावातील सर्वांनीच डोंगर उतारावर गवत लागवड करावी. एका पावसाळ्यात पुढील तीन वर्षांची गरज भागविण्याचे जलनियोजन करण्यासाठीचे प्रयत्न सुरू करावेत, ’’ असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.

Dr. Rajendra Singh
Animal Water Management : जनावरांना पुरेसे शुद्ध पाणी देण्याचे काय आहे महत्त्व?

तीन वर्षात संपूर्ण गावची जलभूगर्भपातळी तीन मीटरने वाढवून गावात कुऱ्हाडबंदी तसेच गावातील धार्मिक वर्गण्या बंद करण्याचे मोठे काम केंदूर (ता. शिरूर, जि.पुणे) येथे झाले आहे. केंदूरचे भूमिपुत्र व कोल्हापूरचे आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर यांच्या पुढाकाराने केंदूरच्या नागरिकांनी हे काम केले. त्याची पाहणी डॉ. सिंह यांनी केली.

जलबिरादरीचे समन्वयक नरेंद्र चुख, मानवलोक संस्थेचे अनिकेत लोहिया, भूगर्भतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, जलनायक रमाकांत कुलकर्णी, यशदाचे डॉ. सुमंत पांडे, आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर, माजी सभापती सदाशिवराव थिटे, सरपंच सूर्यकांत थिटे आदी उपस्थित होते.

Dr. Rajendra Singh
Animal Water Management : पाण्याच्या गुणवत्तेचा जनावरावर काय परिणाम होतो?

डॉ. सिंह म्हणाले, ‘‘शासनाचे चार मोठे जुने पाझर तलाव आहेत. त्यांचे अगदी जमिनीखालून पाणी वाहून जाण्याची क्षमता खरोखरीच उत्तम आहे. त्यामुळे संपूर्ण ३५०० हेक्टर गावाला समपातळीने पाणी पोहचतेय.

यामुळे हे गाव वरील चारही तलाव भरल्यास संपूर्ण वर्षभर अगदी हिरवेगार राहील. मात्र सुक्ष्मसिंचन, पाण्याचा काटकसरीने उपयोग आणि पिकपध्दतीतील सुयोग्य बदल हे झाल्यास हेच पाणी पुढील तीन वर्षांचे जलनियोजन करून देणारे पाणी ठरेल.’’

गाडेकर म्हणाले,‘‘आपल्या १८ हजार लोकसंख्येच्या गावात जेवढे काम झाले आहे ते केवळ १८० लोकांच्या पुढाकाराने झाले आहे. आता या पुढे केवळ १८० नकोत तर १८ हजार लोक पाणीदार चळवळीत उतरणे गरजेचे आहे. हे काम गावाचा पुढील १०० वर्षांचा इतिहास घडविणारे आहे. ’’

‘केवळ ६ टक्के लोकं विधायक कामात’

डॉ. सिंह म्हणाले, ‘‘गावातील केवळ ६ टक्के लोकं अशी विधायक कामांमध्ये पुढाकार घेऊन कामे करतात, तर ४ टक्के हे विरोध आणि आडकाठी आणतात. मात्र ९० टक्क्यांची साथ ही पुढाकार घेणाऱ्या ६ टक्क्यांना राहिल्याने केंदूरमध्ये ३ मीटरने जलस्तर वाढला आहे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com