Jackfruit : माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयास फणस रोपे भेट

कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हे राज्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत असून ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट राहिली आहे.
Jackfruit
JackfruitAgrowon

कोल्हापूर ः कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हे राज्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत असून ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट राहिली आहे असे प्रतिपादन कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम होले (Dr. Uttam Holey) यांनी केले. कृषी महाविद्यालयाच्या (Agriculture University) १९८५ च्या बॅचच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शाहू जयंतीच्या (Rajarshi Shahu Maharaj Birth Anniversary) निमित्ताने आयोजित वृक्षारोपण (Tree Plantation) कार्यक्रमात डॉ. होले बोलत होते.

Jackfruit
फणस आणि हिरव्या मिरचीची धुब्री ते दुबई निर्यात

महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलेश कांबळे यांच्या पुढाकाराने महाविद्यालयाच्या १९८५ च्या बॅचचे विद्यार्थी संजय शिंदे (अतिरिक्त जिल्हाधिकारी), अशोक पाटील (सारथीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी), कृषी विभागाचे कृषी अधिकारी तुकाराम पाटील, राजेंद्र शिंदे, नवोदय विद्यालयाचे मामा पन्हाळकर, वासू फार्माचे राजेंद्र खोबरे, रामेती कोल्हापूरचे शंकरराव माळी यांनी महाविद्यालयास फणसाच्या (Jackfruit Seedling) २३ विविध जातींची सुमारे १०० रोपे भेट म्हणून दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी सिनेअभिनेत्री अपूर्वा नेमळेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. संग्राम धुमाळ, डॉ. उदय शिंदे, डॉ. सीमा सरवदे, डॉ. रवींद्र पवार यांनी परिश्रम घेतले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com