जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

धनखड यांची ६ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती.यासाठी झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांचा पराभव करून धनखड विजयी ठरले.
Jagdeep Dhankhar
Jagdeep DhankharAgrowon

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उमेदवार जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी आज भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली.

धनखड यांची ६ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती.यासाठी झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांचा पराभव करून धनखड विजयी ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन हे केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थित होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मावळते उप राष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, माजी उप राष्ट्रपती हमीद अन्सारी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हेही या सोहळ्यास हजर होते.

Jagdeep Dhankhar
उद्धव ठाकरेंना धक्का: विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाची शिफारस स्वीकारली

धनखड यांनी जनता दलातून राजकारणाला सुरुवात केली. धनखड १९८९ मध्ये झुंझुनूमधून खासदार झाले. पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यावरच त्यांना मोठा पुरस्कार मिळाला. १९८९ ते १९९१ या काळात विश्वनाथ प्रताप सिंह (V.P. Singh) आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीही करण्यात आले होते. मात्र, १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाने जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांचे तिकीट कापले तेव्हा त्यांनी जनता दल सोडला.

त्यानंतर धनखड यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करून १९९३ ला अजमेरच्या किशनगडमधून निवडणूक लढवली आणि आमदार झाले. दरम्यानच्या काळात काँग्रेसमध्ये अपेक्षाभंग झालेल्या धनखड यांनी २००२ भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. २०१९ मध्ये जगदीप धनखड यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले.

Jagdeep Dhankhar
पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून : कालावधीवरून सरकार, विरोधकांत मतभेद

पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासोबतच्या सततच्या संघर्षामुळे धनखड प्रकाशझोतात राहिले. त्यामुळेच कदाचित भाजपने धनखड यांचे नाव उपराष्ट्रपती पदासाठी घोषित केले त्यावेळी ममता यांनी त्यांच्या उमेदवारीला समर्थन देण्याचा निर्णय घेतला.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना १८२ मते मिळाली. धनखड यांनी एकूण वैध मतांपैकी ७२ टक्क्यांहून अधिक मतांसह उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com