
सांगली : गेल्या आठवड्यात संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गुळाची मागणी (Demand for jaggery) वाढली होती. सध्या गुळाची आवक स्थिर आहे. दरही टिकून (Jaggery Rate) आहेत.
येत्या १५ ते २० दिवसानंतर गुळाच्या आवकेत वाढ होऊन दरात किचिंत वाढ होईल, अशी शक्यता गुळाच्या व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
शुक्रवारी (ता. १३) बाजार समितीत गुळाची (Jaggery Market) ५९८८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३६०५ रुपये असा दर मिळाला.
संक्रांती सणानिमित्त १५ दिवसांपूर्वी आठवड्यात दररोज ९ ते १० हजार क्विंटल गुळाची आवक होत होती. बाजार समितीत गूळ खरेदीची लगबग सुरु होती.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच संक्रांती सणानिमित्त गुळाची खरेदी व्यापाऱ्यांनी उरकली आहे. त्यामुळे सध्या बाजार समितीत ५ ते ८ हजार क्विंटलपर्यंत गुळाची आवक होत आहे.
गतसप्ताहापेक्षा चालु सप्ताहात गुळाच्या आवकेत घट झाली असली तरी दर टिकून आहेत. येत्या काळात परराज्यातील सणानिमित्त गुळाची मागणी वाढते. त्यामुळे उठाव अधिक होतो. चिक्की गुळाला अधिक मागणी असल्याने गुळाला प्रतिक्विंटल ४५०० रुपये इतका दर मिळाला.
कर्नाटकातून दर्जेदार गूळ बाजारात येत असल्याने गुळाला राज्यासह परराज्यातून वर्षभर मागणी असते. सध्या संक्रांतीची खरेदी झाल्याने मागणी कमी असल्याने आवकही असल्याचे चित्र आहे.
मार्च महिन्यातील होळी सणाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यापासून गुळाच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांकडून नियोजन केले जाईल. त्यामुळे येत्या १५ ते २० दिवसानंतर गुळाच्या आवकेत वाढ होऊन दरातही वाढ होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सांगली बाजार समिती गुळाची आवक, दर (प्रतिक्विंटल)
तारीख...आवक...किमान...कमाल...सरासरी
शनिवार (ता.७)...४७५४...३२००...४०७५...३६३८
सोमवार (ता. ९)...८८७१..३२००...४१००...३६५०
मंगळवार (ता.१०)...५२८१...३२००...३९६१...३५८१
बुधवार (ता.११)...११४८९...३१००...४०४०...३५७०
गुरुवार (ता.१२)...४०४९...३२००...४१४५....३६७३
शुक्रवार (ता. १३)...५९८८...३२००...४०१०...३६०५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.