Jain Irrigation : शेतकरी केंद्रबिंदू मानून जैन इरिगेशनचे कार्य

जैन इरिगेशनची कायम शेतकऱ्यांशीच बांधिलकी राहणार आहे, जैन इरिगेशनचे प्रत्येक उत्पादन हे शेतकऱ्यांच्या विकासाला पूरक ठरेल असेच असेल.
Jain Irrigation
Jain IrrigationAgrowon

मुंबई ः जैन इरिगेशनने (Jain Irrigation) कायमच शेती व शेतकरी हेच केंद्रबिंदू मानले आहे. कंपनीद्वारे विविध प्रयोग करून शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडावा, सर्वांगिण विकासातून आर्थिक समृद्धी साधता यावी यासाठीच जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ही कंपनी कायमच प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

Jain Irrigation
Irrigation : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी ११ हजार कोटी

मुंबई येथील जगप्रसिद्ध हॉटेल ताजमहाल पॅलेस, गेट वे ऑफ इंडिया येथे कंपनीच्या वतीने आयोजित वितरक परिषदेत अशोक जैन बोलत होते. दोन दिवसीय वितरक परिषदेस महाराष्ट्रातून १७१ निमंत्रित वितरक सहभागी झाले होते.

अशोक जैन यांनी सांगितले की, जैन इरिगेशनची कायम शेतकऱ्यांशीच बांधिलकी राहणार आहे, जैन इरिगेशनचे प्रत्येक उत्पादन हे शेतकऱ्यांच्या विकासाला पूरक ठरेल असेच असेल. यातून बळिराजाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या परिषदेला जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, विपणन प्रमुख अभय जैन, अथांग जैन, अभेद्द जैन, स्टेट हेड एस. एन. पाटील, केळीतज्ज्ञ के. बी. पाटील व कंपनीचे महाराष्ट्रातील सर्व विभागीय व्यवस्थापक उपस्थित होते.

Jain Irrigation
Irrigation : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी ११ हजार कोटी

परिषदेच्या सुरुवातीला वितरकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी कंपनीच्या वाटचाली बाबतचे सविस्तर सादरीकरण केले. एस. एन. पाटील यांनी कंपनीच्या विविध उत्पादनांचे सादरीकरण केले, तर के. बी. पाटील यांनी ऊती संवर्धित संबंधित रोपाविषयी मार्गदर्शन केले.

कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांचे जेआरडी टाटा हे आदर्श होते, त्यांची तत्त्वे आणि मूल्य त्यांनी कायमच अंगीकारली होती. आपण सर्वजण समाजाचे विश्वस्त असल्याने आपल्या मिळकतीच्या अधिक पटीने समाजाला देण्याची भावना ठेऊनच जैन इरिगेशनचे कार्य अविरत सुरू आहे. या परिषदेत कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनीही मनोगत व्यक्त केले.

या दोन दिवसीय परिषदेत वितरकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच वितरकांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल ६० वितरकांना ‘ग्रोथ ड्रायव्हर, बीयांड ग्रेटफुल, सैल्युट टू लॉयल्टी’ या पुरस्कारांनी तसेच कंपनीच्या विविध उत्पादनांची विक्रमी विक्री करण्याचा ६ वितरकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी वितरकांच्या वतीने व्यवस्थापनाचा देखील सन्मान करण्यात आला. वितरक परिषेदेचे सूत्रसंचालन के. बी. पाटील यांनी केले. अतुल जैन यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com