Jalgaon DCC Bank : जिल्हा बँकेच्या संचालिका जनाबाई महाजन अपात्र घोषित

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका जनाबाई महाजन यांनी निवडून आल्यानंतर ६० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर केला नसल्याच्या कारणावरून त्यांना संचालक पदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय नाशिक येथील विभागीय सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी दिला आहे.
Jalgaon DCC Bank
Jalgaon DCC BankAgrowon

रावेर, जि.जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Jalgaon DCC Bank) संचालिका जनाबाई महाजन (Janabai Mahajan) यांनी निवडून आल्यानंतर ६० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर केला नसल्याच्या कारणावरून त्यांना संचालक पदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय नाशिक येथील विभागीय सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी दिला आहे.

Jalgaon DCC Bank
Agriculture Biodiversity : फळपिकांसोबत वीणा जपतेय शिवाराची जैवविविधता

संचालकपदासाठी जनाबाई महाजन यांनी निवडणूक लढविली होती. माजी आमदार अरुण पाटील यांच्याविरुद्ध झालेल्या या निवडणुकीत सुरवातीला जनाबाई महाजन यांनी अरुण पाटील यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. मात्र उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यामुळे जनाबाई महाजन यांचे नाव मतपत्रिकेवर होते.

अखेरच्या क्षणी जनाबाई महाजन यांनी निवडणूक रिंगणात उतरून अवघ्या एका मताने विजय मिळवून खळबळ निर्माण केली होती. मतदानाच्या दिवशी जनाबाई महाजन यांच्या मुलीचा विवाह होता. त्या धावपळीतही जनाबाई महाजन मतदानाला आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या विजयात ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पाठिंबा असल्याचे दिसून आले होते.

Jalgaon DCC Bank
Jalgaon Brinjal : भरीत वांग्यांची लग्नसमारंभ, पार्ट्या, बाजारात रेलचेल

त्यांच्या या निवडीबाबत पराभूत उमेदवार व माजी आमदार अरुण पाटील यांचे पुतणे मंदार पाटील (धामोडी) यांनी तक्रार नोंदवत जनाबाई महाजन यांनी निवडून आल्यानंतर ६० दिवसाच्या आत निवडणूक खर्च सादर केला नाही म्हणून अपात्र ठरविण्याबाबत अर्ज केला होता.

नाशिक विभागीय सहनिबंधक विलास गावंडे यांनी सर्व संबंधितांना नोटीस देऊन बाजू मांडण्याची संधी दिली होती. त्यांनी १९ डिसेंबरला दिलेल्या आदेशात जनाबाई महाजन यांना जेडीसीसी बँकेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास आणि कोणत्याही सहकारी संस्थेचे संचालक मंडळ सदस्य राहण्यास देखील ३ वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे बँकेचे संचालकपद रिक्त होत असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

मी जिल्हा बँक निवडणुकीत झालेला योग्य तो खर्च सादर केला आहे. विरोधकांनी कितीही उड्या मारल्या तरी पाच वर्षे मीच संचालक राहणार आहे. जिल्हा बँक संचालक अपात्रतेच्या सहनिबंधकांच्या आदेशाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहे.

- जनाबाई महाजन, संचालिका, जिल्हा बँक संचालक, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com