Jalgaon District Milk Union : संशयितांचे संचालक मंडळाकडे बोट?

जबाबातून आले समोर; खटल्यात त्रयस्थ अर्जदाराची एन्ट्री
Milk Union
Milk UnionAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : जिल्हा दूध संघ (Jalgaon District Milk Union) अपहार प्रकरणात संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेतील संशयित कार्यकारी अधिकारी मनोज लिमये यांच्यासह इतरांच्या जबाबात आलेले मुद्दे आणि तपासात उघड बाबींमुळे पडद्याआड असलेल्यांकडेच रोख असल्याचे पोलिससूत्रांकडून समजते. आता या प्रकरणात त्रयस्थ अर्जदाराची एन्ट्री झाली असून, दूध संघातील माजी अधिकारी एन. जे. पाटील यांनी न्यायालयात अर्ज सादर केला आहे.

Milk Union
Jalgaon District Milk Producers Union : दूध संघाच्या कार्यकारी संचालका विरुद्ध पुन्हा तक्रार

जळगाव जिल्‍हा दूध उत्पादक संघात अगोदर अफरातफर झाल्याचा अर्ज एका गटाने केला, त्याला काउंटर करण्यासाठी दुसऱ्या गटाने नोंदीमध्ये तफावत समोर आणली. तद्‌नंतर चोरीची तक्रार आली. या सर्व प्रकरणात न्यूट्रल भूमिकेतून प्रकरण आपसांत मिटवून टाकण्याचा सल्लाही देण्यात आला होता. मात्र, दोन्ही गटांतर्फे पोलिसांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. अर्जाची चौकशी करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांची उचलबांगडी करण्यात आली. गुन्हा दाखल करवून घेत नाहीत म्हणून उपोषणही करण्यात आले.

Milk Union
Jalgaon Dairy : कार्यकारी संचालक लिमये यांच्यासह चौघांना अटक

जबाबातून मुद्दे उघड
दाखल गुन्ह्यात इत्थंभूत पुरावे, दस्तऐवज ताब्यात आल्यावर अटकसत्र राबविण्यात येऊन कार्यकारी अधिकारी मनोज लिमये, हरी पाटील, अनिल अग्रवाल आणि रवी अग्रवाल, चंद्रकांत पाटील, किशोर काशिनाथ पाटील अशा सहा संशयितांना अटक झाली. अटकेनंतर तपासात पोलिसांनी संकलित केलेले नमुने, आवश्यक दस्तऐवज आणि पुराव्यांच्या आधारावर संशयितांचे जाबजबाब नोंदवून पंचनामेही करण्यात आले. संशयितांनी पुरविलेली माहिती, प्राप्त दस्तऐवजाच्या आधारे तपासातील प्रगती पाहता अध्यक्ष मंदाकिनी खडसे व संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता पोलिससूत्रांनी दिलेल्या संकेतावरून स्पष्ट होते.

कॅन्टीन, पॅकेजिंगवालाही रडारवर
पोलिसांच्या माहितीनुसार, दूध संघात मुकेश निंबाळकर (शिवाजीनगर) यांना कॅन्टीनचे कंत्राट देण्यात आले होते, तर योगेश निंबाळकर तूप पॅकेजिंगचे काम करीत होता. यांसह प्रदीप पाटील या तिघांच्या नावे अखाद्य तूप घेतल्याच्या नोंदी सापडून आल्या आहेत. तपासाधिकाऱ्यांनी या तिघांचीही चौकशी केली आहे. प्रदीप पाटील याने मंगळवारी (ता. २२) दुपारी तीनला लेखी अर्ज सादर करून माझा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसल्याचे सांगत पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

पाटलांचे अपील
या प्रकरणात संशयितांची जिल्‍हा कारागृहात रवानगी झाली असून, संशयितांच्या टोळीतील म्होरक्याविरुद्ध पुरावे संकलनाचे काम पोलिस करीत आहेत. न्यायालयात दाखल खटल्यात आता माजी सैनिक, तसेच दूध संघातील माजी सुरक्षा अधिकारी एन. जी. पाटील यांनी त्रयस्थ अर्जदार म्हणून अपील केले आहे.
Remarks :

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com