Jalgaon Election : जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा रंगणार आखाडा

सत्तांतरानंतर जिल्ह्यात सामना
Jalgaon Election
Jalgaon ElectionAgrowon

जळगाव : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका (Co-operative Society) शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित केल्या होत्या. मात्र आता त्यावरील स्थगिती उठविली आहे. ज्या संस्थांना ज्या टप्प्यावर स्थगिती दिली होती त्यापासून पुढे निवडणूक प्रक्रिया (Election Process) सुरू करण्यासह ज्या संस्थाची अंतिम मतदार प्रसिद्धीनंतर पुढे ढकलण्यात आला होता.

Jalgaon Election
APMC Election : बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा

त्यांनी प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा, असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. याबाबत अध्यादेश त्यांची जारी केला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jalgaon Election
APMC Election : बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकांना ज्या-त्या टप्प्यावर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांना ३० सप्टेबरपर्यंत स्थगिती दिली होती.

Jalgaon Election
Grampanchayat Election : राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींच्या तेरा ऑक्टोबरला निवडणुका

त्यामुळे जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीलाही स्थगिती मिळाली होती. या स्थगिती कालावधीची मुदत आज संपली होती, मात्र शासनाने पुढे स्थगिती देण्याबाबत कोणतेही आदेश दिले नसल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेल्या अध्यादेशात म्हटले आहे.

त्यामुळे आता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांचा रणसंग्राम होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एस. खंडागळे यांनी या आदेशात म्हटले आहे,

की सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर आल्या होत्या, त्या टप्प्यापासून पुढे सुरू कराव्यात व ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक अंतिम मतदार याद्या प्रसिध्दी नंतर पुढे ढकलण्यात आला आहे.

अशा सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २०१४ चे नियम १८ मधील तयार करून प्राधिकरणाच्या मान्यतेस्तव सादर करावा, त्याच्या मान्यतेनंतर कार्यक्रमास व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत कोरोना काळात सन २०२० मध्ये संपली होती, मात्र कोरोनामुळे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली. आता पुढील प्रक्रिया सुरू होऊन निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल.

दूध संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कार्यरत आहे. आता शिवसेनेचा शिंदे गट व भाजप एकत्र आहे. तर शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्र आहे. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, भाजप नेते गिरीश महाजन हे राज्यात मंत्री आहेत. यामुळे निवडणुकीत या रंग भरेल, असे दिसत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com