Jalyukt Shiwar Scheme : जलयुक्तच्या कामांवर आता ‘ऑनलाइन' नजर

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मृद व जलसंधारणाची कामे विविध विभागांमार्फत सुरू होती. त्यात कृषी विभाग आघाडीवर होता. या कामांमध्ये राज्यभर गोलमाल होत असल्याची बाब लपून राहिली नाही.
Jalyukt Shiwar
Jalyukt ShiwarAgrowon

Pune News : मृद व जलसंधारणाच्या नावाखाली अब्जावधी रुपयांची उधळपट्टी आतापर्यंत राज्यात झाली. मात्र, या कामांची एकत्रित माहिती उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर आता महाआयटीच्या (MahaIT) मदतीने स्वतंत्र संकेतस्थळ व ऑनलाइन संनियंत्रण प्रणाली तयार करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. (Jalyukt Shiwar Scheme)

“राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मृद व जलसंधारणाची कामे विविध विभागांमार्फत सुरू होती. त्यात कृषी विभाग आघाडीवर होता. या कामांमध्ये राज्यभर गोलमाल होत असल्याची बाब लपून राहिली नाही. त्यामुळे नागरिकांना या कामांची एकत्रित माहिती मिळू नये, अशी दक्षता सर्वच विभागांनी घेतली.

पाणलोटाचे उपचार नकाशे, झालेला खर्च याचीही माहिती जाहीर केली गेली नाही. जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातदेखील हेच घडले. मात्र, अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात संकेतस्थळ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Jalyukt Shiwar
Jalyukt Shiwar Scheme : ‘जलयुक्त’मध्ये डागडुजी, अपूर्ण कामांवर लक्ष्य

नव्या ऑनलाइन संनियंत्रण प्रणालीत मृद व जलसंधारणाच्या प्रत्येक कामांची खर्च व स्थळे दिसणार आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी दोनदा कामे दाखविण्याचे खटाटोप होणार नाहीत.

कामांचे जिओ मॅपिंग तसेच जलसंधारण उपचार नकाशे अद्ययावत होत राहतील. या प्रणालीच्या नियोजनाचे व पारदर्शकपणे चालविण्याची जबाबदारी राज्याच्या मृद व जलसंधारण आयुक्तांकडे देण्यात आली आहे.

कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केवळ संकेतस्थळच नव्हे; तर त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, जलयुक्त शिवाराची कामे करताना प्रत्येक घडामोड संबंधित गावातील ग्रामसभेसमोर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Jalyukt Shiwar
Jalyukt Shiwar : जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

जलसंधारणाचा निधी वाटण्याचे अधिकार आता कृषी विभागाऐवजी जलसंधारण आयुक्तांकडे गेले आहेत.

जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने जिल्हा जलसंधारण अधिकारी यापुढे सर्व विभागांना निधी देतील. त्यामुळे जलसंधारण अधिकाऱ्याची खुर्ची आता मलईदार पद म्हणून ओळखली जात आहे.

या घडामोडी बघता गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाइन संनियंत्रण अत्यावश्यक ठरत होते. ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यासाठी शासनानेही मान्यता दिलेली आहे. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही.

Jalyukt Shiwar
Jalyukt Shiwar Abhiyan : जलयुक्त शिवारच्या नावाखाली झालेली नद्यांची उकराउकरी

लॉबी खूष, ठेकेदार आनंदी

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यात पाच हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविली जाईल. यात जलसंधारण व मृद्संधारणाची कामे मोठ्या संख्येने होतील. त्यासाठी भरपूर निधी येणार असल्यामुळे प्रशासनातील ‘जलसंधारण लॉबी’ सध्या खूष आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या मृद व जलसंधारणविषयक योजना, कृषी विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प, जिल्हा परिषद निधी, सीएसआर निधी अशा विविध माध्यमांमधून अब्जावधी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली गेली आहे. त्यामुळे ‘ठेकेदार लॉबी’देखील आनंदात आहे.

ऑनलाइन प्रणालीच वैशिष्ट्ये

- विविध योजनांमधून कोणत्या गावात, कोणती कामे झाली याचे अहवाल तयार होतील. ते अद्ययावतदेखील केले जातील.

- ठेकेदाराला मिळणाऱ्या कार्यादेशात गैरव्यवहाराची पाळेमुळे असतात. या कार्यादेशांची माहिती संकेतस्थळावर दिली जाणार

- काम सुरू होण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर जिओ टॅगिंग बंधनकारक असेल. ती माहिती या प्रणालीत मिळेल

- ठेकेदारांना टप्याटप्यात देयके दिली जात असल्यास प्रत्येक टप्प्याचे जिओ टॅगिंग होणार

- प्रत्येक कामाचे जल परिपूर्णता अहवाल स्वयंचलित प्रणालीतून तयार होणार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com