Jalyukta Shivar : ‘पुनश्च हरिओम’; जलयुक्त शिवारची आजपासून सुरुवात

Jalyukta Shivar 2.0 : देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. आजपासून ही योजना सुरु होत असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केले.
Jalyukat Shivar Yojana
Jalyukat Shivar YojanaAgrowon

Jalyukta Shivar Abhiyan Latest : देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त योजना पुन्हा सुरु करण्यात आली. आजपासून जलयुक्त शिवाय पुन्हा सुरु होणार असल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

योजनेच्या माध्यमातून जेसीबी, पोकलेन मशिनला डिझेल परतावा मिळणार आहे, असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे

Jalyukat Shivar Yojana
Jalyukta Shivar Yojana : जलयुक्त शिवार टप्पा २ ची कामे तातडीने सुरू करा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

देसाई म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध जलस्रोतांचे बळकटीकरण करून यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान टप्पा एक मध्ये केलेल्या कामांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करावी. नवीन कामे लोकसहभागातून करून हे अभियान व्यापक स्वरूपात यशस्वी करावे. या अभियानांतर्गत गाळमुक्त धरण अभियानाची व्यापक अंमलबजावणी करावी.

धरणांमधील गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांच्या मूळ साठवण क्षमतेत वाढ होईल. विविध स्थानिक स्वयंसेवी संस्थांची या अभियानासाठी मदत घ्यावी. सर्व जिल्हाधिकारी यांनी स्वतः संपूर्ण अभियानावर लक्ष ठेवून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून प्राधान्यक्रमाच्या कामाची यादी घेवून त्यानुसार कामाचे नियोजन करावे, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com