
गडहिंग्लज : शेतमालाला उत्पादन खर्च (Production Cost) अधिक लाभकारी मूल्य मिळावे, यांसह विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघातर्फे (Bharatiya Kisan Sangh) दिल्ली येथे आंदोलन केले जाणार आहे. याबाबत जनजागरणासाठी (Jan Jagran Padyatra) येथील शाखेतर्फे पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथून पदयात्रेस प्रारंभ झाला.
शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक लाभकारी मूल्य मिळाले पाहिजे, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक आणि इतर निविष्ठांवरील सेवा कर रद्द करावा, किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ भरघोस वाढ करावी या मागण्यांसाठी भारतीय किसान संघातर्फे १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे आंदोलन केले जाणार आहे. त्याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, या उद्देशाने पदयात्रा काढण्यात आली. मुत्नाळ येथील हुतात्मा बिंदू नारायण कुलकर्णी यांच्या स्मारकापासून पदयात्रेस प्रारंभ झाला.
या वेळी उपसरपंच अक्षय पाटील, राकेश पाटील, राजू रामाज, विजय हट्टी, रोहित पाटील यांच्यासह भारतीय किसान संघाचे महामंत्री मदन देशपांडे, तालुकाध्यक्ष बसवराज हंजी, बाळगोंडा पाटील, राम पाटील, अजित नडदगल्ली, सचिन जाधव, संभाजी साळवी आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.