जायकवाडी ८० टक्क्यांवर

जलविद्युत निर्मिती केंद्र आणि उजव्या कालव्यातून विसर्ग
Jaykwadi Dam
Jaykwadi DamAgrowon

औरंगाबाद : पैठण येथील जायकवाडी (नाथसागर) प्रकल्प (Jaykwadi Dam) ८०.५७ टक्के भरल्याने नाथसागराच्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून मंगळवारी (ता. १९) सायंकाळी व उजव्या कालव्यातून बुधवारी(ता. २०) सकाळी ११ वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा विसर्ग केव्हाही सुरू होऊ शकतो, असे जायकवाडी पाटबंधारे विभागाचे (Jaykwadi IrrigationDepartment) कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी आधीच स्पष्ट केले होते.

Jaykwadi Dam
Water Storage: जायकवाडी पाणीसाठा 60 टक्क्यांवर

प्रकल्प प्रचलन आराखड्यानुसार नाथसागराच्या जलविद्युत वीज निर्मिती केंद्रातून गोदावरी नदीच्या पात्रात १५८९ क्युसेक पाण्याचा विसर्ग मंगळवारी(ता. १९) संध्याकाळी ७ वाजता सुरू करण्यात आला. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून विद्युत निर्मिती केंद्राच्या बंद पडलेले टरबाईनची चाके फिरू लागल्याने वीज निर्मिती सुरू झाली आहे. बुधवारी (ता. २०) सकाळी जायकवाडीमध्ये उपयुक्त पाणीसाठा १७४९.१७७ दलघमी झाला आहे.

एकूण उपयुक्त पाण्याची टक्केवारी ८०.५७ टक्के इतकी झाली. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता पाण्याची आवक ५१ हजार ७२१ क्युसेकने प्रति सेकंद वेगाने प्राप्त होत होते. बुधवारी सकाळी १० वाजता ही आवक ३०३४१ क्युसेकने सुरू होती. धरण परिसरात पाऊस सुरू असून तो असाच राहिल्यास धरणाच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. वरिष्ठ अधिकारीवरील पूरपरिस्थिती व पर्जन्यमानाचा अंदाज घेत आहेत.

नाथसागर धरणाच्या सांडवाच्या मुख्य व्दारातून गोदावरी नदीच्या पात्रामध्ये कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय होऊ शकतो असे जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. जाधव, उपविभागागीय अभियंता अशोक चव्हाण, धरण अभियंता विजय काकडे यांनी कळविले होते. दरम्यान बुधवारी (ता. २०) जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून ३०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गात टप्याटप्याने वाढ करण्यात येणार असल्याचे प्रकल्प व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com