Jayakwadi Project : जायकवाडी डाव्या कालव्याद्वारे पहिले आवर्तन सुरू

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामातील सिंचनासाठी पहिले आवर्तन शुक्रवारी (ता. १८) सोडण्यात आले आहे.
Water
WaterAgrowon

परभणी ः पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या (Jayakwadi Project) डाव्या कालव्याद्वारे (Canal Water) यंदाच्या (२०२२-२३) रब्बी (Rabi season) हंगामातील सिंचनासाठी (Irrigation) पहिले आवर्तन शुक्रवारी (ता. १८) सोडण्यात आले आहे. परभणी जिल्ह्याच्या हद्दीत शुक्रवार (ता. २५)पर्यंत पाणी पोहोचेल, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ च्या कार्यकारी अभियंता मयूरा जोशी यांनी दिली.

Water
Jayakwadi Dam : जायकवाडीचे धरणाचे दरवाजे उघडले!

जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या परभणी जिल्ह्यातील लाभक्षेत्रात मुख्य कालव्याची (१२२ ते २०८ किलोमीटरपर्यंत) एकूण लांबी ८६ किलोमीटर आहे. वितरण प्रणाली अंतर्गत पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यातील एकूण ९७ हजार ४०० हेक्टर क्षेत्र सिंचन क्षमता आहे. गतवर्षी प्रमाणेच यंदाही हे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी आवर्तनाद्वारे पाणी उपलब्ध होणार आहे.

Water
Water Spinach : पाणपालक आरोग्यासाठी का आहे फायदेशीर?

गुरुवारी (ता. १७) झालेल्या कालवा सल्लागार समितीची बैठकीत धरणातील पाणी वापराचे नियोजन करण्यात आले. शुक्रवारी (ता. १८) दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान धरणातून डाव्या कालव्यात १०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. रब्बी हंगामात पाच आणि उन्हाळी हंगामात तीन अशी एकूण आठ पाणी आवर्तने सोडण्याचे नियोजन आहे.

परंतु त्यात बदल होऊ शकतो. शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज करणे आवश्यक आहे.पीकनिहाय सिंचनासाठी पाण्याचा उपयोग करावा लागेल. पाणी वापर केलेल्या क्षेत्रानुसार लाभधारक शेतकऱ्यांनी नियमित पाणीपट्टीचा भरणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे कालव्याची देखभाल दुरुस्ती, व्यवस्थापन करणे शक्य होईल, असे सूत्रांनी सांगितले

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com