Jejuri Khandoba : मार्तंड देवस्थान विश्वस्तांच्या निवडीला जेजुरीकरांचा विरोध

Khandoba Mandir Jejuri : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त निवडीचा वाद चांगलाचा चिघळला आहे.
Jejuri Khandoba Temple
Jejuri Khandoba Temple Agrowon

Jejuri News : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त निवडीचा वाद चांगलाचा चिघळला आहे. नव्या विश्वस्तांच्या निवडीला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे.

या पार्श्वभूमीवर जेजुरीतील नागरिकांना रास्ता रोको आंदोलन केले आहे. तत्पूर्वी विश्वस्तपदाचा पदभार घेण्यासाठी आलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवरोधात गुरूवारी (ता. २५) जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लाखो भाविक येत असतात. मात्र, याच जेजुरीच्या मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदी जेजुरीबाहेरील लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विश्वस्तांच्या या निवडीला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. देवस्थानच्या या निर्णयाविरोधात जेजुरीकर आक्रमक झाले असून त्यांनी पुणे पंढरपुर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे.

Jejuri Khandoba Temple
Agriculture Mechanization : पेरणी यंत्रांमुळे होतेय वेळ, बियाणे बचत

काय आहे प्रकरण

जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात जणांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली होती. मात्र, या निवडीमध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून जेजुरी बाहेरील सहा जणांची निवड ही राजकीय हस्तक्षेपामुळे करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सध्या जेजुरीतील स्थानिक नागरिकांमधून याविषयी प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे.

Jejuri Khandoba Temple
Agriculture Scheme : जळगावमध्ये कृषी योजनांपासून शेतकरी वंचित

नव्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी

विश्वस्तपदी निवड झाल्यानंतर गुरूवारी पदभार स्विकारण्यासाठी आलेल्या नव्या विश्वस्तांविरोधात स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारमुळे काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते. स्थानिकांना डावलून जेजुरी बाहेरील विश्वसांतांच्या निवडीविरोधात आजपासून जेजुरीत चक्री उपोषणाचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे.

दरम्यान, मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदी निवड झालेले पाच ते सहा विश्वस्त हे एकाच राजकीय पक्षाशी संबंधित असून ते जेजुरी बाहेरील रहिवाशी असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com