Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime
Crime Agrowon

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंब्रा येथे रविवारी (ता. १३) रात्री कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.

Crime
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

दरम्यान, पोलिसांनी राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल केला आहे. लोकशाहीची हत्या उगड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यामुळे आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याची माहिती आव्हाड यांनी सोशल मीडियावरून दिली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आव्हाड यांची समजूत काढत राजीनामा न देण्याची विनंती केली.

मुंब्रा-कळवा येथे उड्डाण पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी उद्‌घाटन झाले. यानंतर शिंदे यांचा ताफा बाहेर पडत असताना आमदार जितेंद्र आव्हाड हे गर्दी बाजूला करत असताना त्यांनी संबंधित महिलेला बाजूला ढकलले. आव्हाड यांच्या या कृतीचा व्हिडिओही समोर आला आहे.

संबंधित महिला ही भाजपची पदाधिकारी आहे. तिने रात्री उशिरा मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आव्हाड यांच्यावर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान ही माहिती मिळताच आव्हाड यांनी, माझ्यावर गेल्या ७२ तासांत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मी या पोलिसी अत्याचाराविरोधात लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असे ट्विट केले.

Crime
Crop Damage Survey : मंगळवेढ्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्याबाबत नव्याने आदेश

आव्हाड यांच्या या पवित्र्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे यांनी आव्हाड यांनी असे न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाड यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांना राजीनामा देऊ नये असे सांगितले.

विनयभंग झाला की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे'

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, ‘जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा तयार ठेवला आहे. परंतु ते आधी शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर चर्चा करून ठरवून निर्णय घेतला जाईल.’ मुख्यमंत्री शिंदे केवळ पाच सहा फूट अंतरावर होते. त्यांच्या समक्ष हा प्रकार झाला असेल तर त्यांनीही स्पष्ट सांगावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com