कैद्यांसाठी ‘जिव्हाळा’ कर्ज योजना

गृहमंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन
Loan Scheme For prisoners
Loan Scheme For prisonersAgrowon

पुणे ः ‘‘कारागृहातील अनेक बंदी घरांतील कर्ते असतात, त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दवाखान्याचा खर्च आणि इतर कारणांसाठी राज्य सरकारने त्यांना कर्ज (Loan For Prisoner) देण्याचा निर्णय घेतला आहे. बंद्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, आरोग्य, मुलांचे शिक्षण (Children's Education) आणि शिक्षेच्या कालावधीनंतर, तसेच बंद्यांचे पुनर्वसन सोपे व्हावे, या उद्देशाने ‘जिव्हाळा’ही कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या कर्जाची परतफेड बंद्यांना कारागृहातून मिळणाऱ्या उत्पन्नातून केली जाणार आहे. यामुळे बंदी आणि त्याच्या कुटुंबातील सलोखा वाढण्यास मदत होणार आहे,’’ असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले.

राज्य सहकारी बँकेतर्फे (State Co-Operative Bank) कारागृहातील बंद्यासाठी तयार केलेल्या ‘जिव्हाळा’ या कर्ज योजनेचा प्रारंभ रविवारी (ता.१) गृहमंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिरिक्त अपर पोलिस महासंचालक आणि कारागृह सुधारसेवा महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, अधीक्षक राणी भोसले, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख उपस्थित होते.

कर्जवितरण योजनेत प्रायोगिक तत्त्वावर ५० हजार रुपयांची मर्यादा असली तरी व्यवहार चांगला असेल तर कर्जमर्यादा वाढवून द्यावी, तसेच मानसिकता बदलण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी ही योजना आहे. येरवडा कारागृह कर्ज योजना राज्यातील सर्वच कारागृहात राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी दिल्या.

कारागृह सुधारसेवा महानिरीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, ‘‘२२२ पुरुषबंदी व ७ महिलाबंदी यांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे. कर्ज वितरणाचा हा देशातील पहिलाचा उपक्रम ठरणार आहे. येरवडा कारागृहात यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतर कारागृहातही योजना राबविण्यात येणार आहे. बंद्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे.’’ या वेळी विद्याधर अनास्कर (Vidyadhar Anaskar) यांनी कर्ज योजनेबाबत माहिती दिली. या वेळी कारागृहातील बंद्याना कर्जवितरणाच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com