Jowar Cultivation : अकोल्याच्या कृषी विद्यापीठात ज्वारीच्या २५ हजार जननद्रव्यांची लागवड

शास्त्रज्ञांनी मेहनत घेऊन या ठिकाणी ज्वारीच्या २५ हजार जननद्रव्यांची लागवड केली आहे. या जननद्रव्यांचा अभ्यास केला जाणार आहे.
Jowar Cultivation
Jowar Cultivation Agrowon

Washim News ः शास्त्रज्ञांनी मेहनत घेऊन या ठिकाणी ज्वारीच्या (Jowar) २५ हजार जननद्रव्यांची लागवड ()Jowar Cultivation केली आहे. या जननद्रव्यांचा अभ्यास केला जाणार आहे.

ही एक शास्त्रज्ञ, बीजोत्पादक तसेच शेतकऱ्यांसाठी गौरवशाली पर्वणी ठरणार आहे, असा विश्वास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांनी व्यक्त केला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे वाशीम येथील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर ज्वारी जननद्रव्य प्रक्षेत्र दिवस सोमवारी (ता. १३) आयोजित करण्यात आला होता. या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गडाख बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र कृषी संशोधन व विकास परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, आईसीईआरचे संचालक (एनबीपीजीआर) ग्यानेंद्रप्रताप सिंग, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, इक्रिसॅटचे ज्वारी संशोधक प्रमुख डॉ. ईफ्रेम हबरिमा, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, डॉ. सुरेंद्र काळबांडे, डॉ. डी. बी. उंदीरवाडे, ज्वारी संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. आर. बी. घोराडे, संशोधक डॉ. भरत गिते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

Jowar Cultivation
Jowar Harvesting : खानदेशात दादर ज्वारी आली मळणीवर

या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने १६ एकर शेतामध्ये या जननद्रव्यांची संवर्धित प्रणाली (Augmented design) मध्ये लागवड करण्यात आली आहे. यातील बरीच जननद्रव्ये ही अतिशय दुर्मिळ स्वरूपाची आहेत. त्यासाठी एकंदरीत पूर्ण परिसरात नऊ विभाग करण्यात आले.

Jowar Cultivation
Jowar Crop : ज्वारी पिकात तयार केला हातखंडा

त्यासोबतच ज्वारीचे सध्याचे सहा वैशिष्ट्यपूर्ण वाण हे नियंत्रक वाण म्हणून वापरण्यात आले आहेत. ज्वारी जननद्रव्ये तपासणी कार्यक्रम राष्ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन ब्युरो (NBPGR) नवी दिल्ली यांनी पुरस्कृत केला आहे. भारतीय तृणधान्य संशोधन संस्था (IIMR) हैदराबाद व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्याची अंमलबजावणी केली.

प्रास्ताविक कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी केले. डॉ. आम्रपाली आखरे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमापूर्वी जननद्रव्यांची लागवड केलेल्या ज्वारीच्या प्रक्षेत्राला शेतकरी, शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांनी भेट दिली.

या वेळी अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा, कुलगुरू डॉ. गडाख यांच्यासह इतर वरिष्ठ मान्यवरही सहभागी झाले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com