
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून सत्ताधारी आणि विरोधकांसाठी वेगवेगळा न्याय देण्यात येत असल्याची टीका ज्येष्ठ सदस्य अनिल परब (Anil Parab) यांनी केला. कायदा व सुव्यवस्था याविषयावर विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते. परब म्हणाले, की सत्तेतील मंत्र्यांवर एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे.
काही आमदार हातपाय तोडण्याची भाषा करतात, टेबल जामीन मिळवून देण्याची भाषा करतात. पोलिस ठाण्यात गोळीबार केला जातो या घटना घडत असताना त्यावर कारवाई होत नाही. मात्र, एक आमदाराची शाब्दिक चकमक झाली तरी गुन्हा दाखल केला जातो. अशाने न्याय देता येणार नाही. खुद्द माझावर ईडीसह अनेक गुन्हे दाखल झाले.
ज्या प्रकरणाशी संबंध नाही त्याचीही चौकशी झाली. मी काहीही चुकीचे केले नाही म्हणून घाबरत नाही. पण सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत आहे. अशा खोट्या गुन्ह्यात अडकविणार असल्यास जनतेला उत्तर द्यावे लागेल, असेही परब म्हणाले.
मराठी भाषा भवनात इतर कार्यालये
गेल्या सरकारने भूमिपूजन केलेल्या मराठी भाषा भवनात इतर विभागाचे कार्यालय हलविण्यात येत आहे. असे झाल्यास हे मराठी भाषेचे धोरण तुडविले जाईल, असे अनिल परब म्हणाले
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणाची
चौकशी केंद्रीय यंत्रणेकडे द्यावी ः खडसे
रश्मी शुक्ला यांनी माझा ६८ दिवस फोन टॅपिंग केली. ही टॅपिंग त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून केली, कोणाच्या सांगण्यावरून कृत्य केले या बाबत विचारणा केली. त्यांनी माझे राजकीय, निवडणुकांचे संभाषण वापरले? हे माहिती नाही. असे संभाषण मुख्यमंत्री, सचिव गृहमंत्री यांच्या परवानगी शिवाय होत नाही.
हा घटनात्मक व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे. विशेष म्हणजे या बाबत रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दिला. तो न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे आता याची चौकशी केंद्रीय यंत्रणेमार्फत करावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय जमीन प्रकरणात कुठलाही प्रत्यक्ष सहभाग नसताना सातत्याने चौकशीच्या फेऱ्यात अडकविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.