Agriculture Award : कार्ड्‌स’चे कृषी पुरस्कार जाहीर

केद्राई भूषण’ पुरस्कारासाठी १४ जणांची निवड
कृषी पुरस्कार
कृषी पुरस्कारAgrowon

नाशिक : शेती व ग्रामविकासात कार्यरत असलेली केद्राई कृषी व ग्रामविकास संस्था (कार्ड्स) यांच्या वतीने २०२२-२३ साठी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांच्यासह १४ व्यक्तींची संस्थेने केद्राई भूषण पुरस्कारासाठी निवड केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वसंत शिंदे यांनी दिली.

संस्थेने पुरस्करासाठी १४ जणांची निवड केली आहे. कृषी, कृषी संशोधन, कृषी उद्योजकता, सेंद्रिय शेती, कृषी पत्रकारिता, महिला बचत गट, आर्थिक नियोजन, सामाजिक या क्षेत्रांतील व्यक्तींचा निवड केलेल्यांमध्ये समावेश आहे.

कृषी पुरस्कार
Agriculture Award : डॉ. बेग यांना उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार

आधुनिक शेती पद्धतीने काम करणारे किरण बोराडे (सिन्नर, नाशिक), सेंद्रिय शेतीसाठी मनीषा झाडे (इगतपुरी, नाशिक), जैवतंत्रज्ञान संशोधक डॉ. जगन भालेराव (औरंगाबाद), कृषी विज्ञान केंद्र, घाटखेड (अमरावती) येथील गृहविज्ञान शाखेच्या विषय विशेषज्ञ डॉ. प्रणिता कडू (अमरावती), सिंचन व्यवस्थापन क्षेत्रात काम करणारे अरुण देशमुख (पुणे), महिला बचत गट क्षेत्रात काम करणाऱ्या अश्विनी बढे-भागवत (पुणे), कृषी पत्रकार कुबेर जाधव (देवळा, नाशिक), कृषी संघटन क्षेत्रात काम करणाऱ्या मंगल कडुस (पुणे), ऊस संशोधक डॉ. रमेश हापसे (पुणे), अर्थिक व्यवस्थापन सल्लागार दीपाली चांडक, कृषी उद्योजक सुयोग गिते (निफाड, नाशिक), सामजिक कार्यकर्ते राजाभाऊ शेलार, ‘मोर्फा’चे प्रल्हाद वरे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com