Karnala Bird Sanctuary : कर्नाळा पक्षी अभयारण्य पुन्हा पर्यटकांनी गजबजले

पनवेलपासून जवळ असणाऱ्या कर्नाळा पक्षी अभयारण्य, तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर गिर्यारोहण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Karnala Bird Sanctuary
Karnala Bird SanctuaryAgrowon

नवीन पनवेल ः पनवेलपासून जवळ असणाऱ्या कर्नाळा पक्षी अभयारण्य (Karnala Bird Sanctuary), तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर गिर्यारोहण (Mountaineering) करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दोन वर्षांमध्ये तब्बल १,९०,४९१ पर्यटकांनी येथे भेट दिली असून यातून ९३,३६,६६० इतके प्रवेश शुल्क मिळाल्याची माहिती अभयारण्य प्रशासनाने दिली आहे.

Karnala Bird Sanctuary
Agriculture : कर्नाटकात शेतीसाठी अधिक योजना

मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. लोणावळ्याप्रमाणे कर्नाळा उंचावर असल्याने येथील वातावरण नेहमीच थंड असते. निसर्ग, हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत.

Karnala Bird Sanctuary
Agriculture exhibition : माळेगाव यात्रेत कृषी प्रदर्शनाचे आयोजन

याशिवाय रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तूर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतद्वाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बहिरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल यांसारखे सुमारे १३४ प्रजातींचे स्थानिक, तर ३८ प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आहेत.

त्यामुळे पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने कर्नाळा अभयारण्यात येतात. मुंबई-गोवा महामार्गालगत असणाऱ्या या पर्यटन क्षेत्रामध्ये कोकणात जाणारे अनेक जण थांबतात. त्याचबरोबर कर्नाळ्याला ऐतिहासिक वारसा असल्याने गिर्यारोहकांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे साहजिकच कर्नाळा परिसरामध्ये पक्षीप्रेमी गिर्यारोहकांचे प्रमाण वाढले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com