Kartiki Vari : ‘कार्तिकी वारीचा’चा उद्या सोहळा, वारकऱ्यांच्या गर्दीने पंढरी गजबजली

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक होणार महापूजा
Kartiki Vari
Kartiki VariAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची आस ठेवून शुक्रवारी (ता. ४) होणाऱ्या कार्तिकी वारीच्या (Kartiki Vari) सोहळ्यात सहभागासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी (Varkari) पंढरपुरात दाखल होत असून, पंढरपुरातील वर्दळ चांगलीच वाढली.

Kartiki Vari
Cotton Production: देशातील कापूस उत्पादकता कमी का ? | ॲग्रोवन

एकीकडे वारकऱ्यांची लागलेली रीघ आणि दुसरीकडे हरिनामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने बुधवारी (ता.२) अवघी पंढरी दुमदुमून गेली. दरम्यान, शुक्रवारी पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे.
आषाढी-कार्तिकी या वर्षातील दोन मोठ्या वाऱ्या समजल्या जातात.

Kartiki Vari
Soybean Market : सोयाबीन हमी केंद्रांचा ‘पत्ता गुल’ ऑक्टोबर संपला तरी धोरण नाही

आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार ही महापूजा होणार आहे. कार्तिकीच्या या सोहळ्यात सहभागासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरपुरात येऊ लागल्या आहेत. शहरातील विविध मंदिरे, मठ, धर्मशाळांमधून भजनाचे सूर आळवले जात आहेत. अनेक ठिकाणी प्रवचने आणि कीर्तने रंगली आहेत.

मंदिर परिसरासह नगरप्रदक्षिणा मार्गावर तसेच चंद्रभागा वाळवंटात वारकऱ्यांची रेलचेल वाढली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन २४ तास खुले करण्यात आले आहे. दर्शनरांगांसह मुखदर्शनाच्या रांगेतही वारकऱ्यांची गर्दी आहे. दर्शन मंडपामध्ये वारकऱ्यांना पाणी आणि चहाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.

दर्शनरांगेत आज किमान १० हजारांपर्यंत वारकरी उभे होते. चंद्रभागेतील दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने शुक्रवारी रात्रीपर्यंत पंढरीत आणखी गर्दी वाढणार आहे. दर्शनरांग आणि मंदिर परिसरात मंदिरातील थेट दर्शनासाठी चार एलईडी स्क्रीनही बसवण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात सोई-सुविधांसह सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन आणि पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com