Mumbai News : खारघरचा गोल्फ कोर्स चौकशीच्या फेऱ्यात

सिडकोकडून अकरा गोल्फ कोर्सचे काम काम पूर्ण झाले होते. मात्र, अतिरिक्त गोल्फ कोर्ससाठी वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या टेकडीवर जेसीबी लावून खोदकाम करून सपाटीकरणाचे काम केले जात आहे.
Mumbai News
Mumbai NewsAgrowon

खारघर : खारघर, सेक्टर २३ व २४ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्ससाठी (International Golf Course) १८ होलची रचना केली होती. त्यासाठी खारघर (Kharghar) टेकडीवर खोदकाम केले जात असल्याने याबाबत पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.

त्यावर मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले असल्याने सिडकोचा (CIDCO Project) महत्त्वाकांशी प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात आला आहे.

सिडकोकडून अकरा गोल्फ कोर्सचे काम काम पूर्ण झाले होते. मात्र, अतिरिक्त गोल्फ कोर्ससाठी वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या टेकडीवर जेसीबी लावून खोदकाम करून सपाटीकरणाचे काम केले जात आहे.

या प्रकारामुळे नाराज झालेल्या पर्यावरणप्रेमींच्या नाटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी पनवेल प्रांत अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडॆ लेखी तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेऊन सर्कल अधिकारी संतोष कचरे यांच्या पथकाने पाहणी केली असता, खोदकाम करताना कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले होते.

मात्र, सिडकोने परवानगी घेऊन काम करीत असल्याचे सांगून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे खारघरमधील पर्यावरणप्रेमींना टेकडी बचाव अभियान सुरू केले आहे.

तसेच पर्यावरण विभागाच्या मंजुरीशिवाय डोंगराचे खोदकाम केल्याची तक्रार नाटकनेक्टने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडेही केली होती.

Mumbai News
Village Life : एका डोंगर माळरानाची सोबत

त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन शिंदे यांनी शहर विकास विभागाचे प्रमुख सचिव भूषण गगराणी यांना ईमेलद्वारे चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सिडकोचा गोल्फ कोर्स चौकशीच्या घेऱ्यात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com