
अॅग्रोवन वृत्तसेवा
Parbhani Agriculture News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा (VNMKV) ५१ वा वर्धापन दिन, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आणि आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाचे औचित्य साधून विस्तार
शिक्षण संचालनालय आणि कृषी विभाग (Agriculture Department) महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पीक परिसंवादाचे आयोजन गुरुवारी (ता. १८) सुवर्ण जयंती दीक्षान्त सभागृहामध्ये करण्यात आले आहे.
या वेळी विद्यापीठ निर्मित विविध पिकांचे सत्यतादर्शक बियाणे विक्रीची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यात सोयाबीनचे एमएयूएस-१६२, एमएयूएस-१५८ आणि एमएयूएस-७१ या वाणांचे बियाणे उपलब्ध आहे. सोयाबीन बियाण्याची २६ किलोच्या पिशवीची किंमत ३ हजार ९०० रुपये आहे.
तुरीच्या बीडीएन-७१६ (लाल) व बीडीएन-७११ (पांढरी) या वाणाच्या ६ किलो वजनाच्या पिशवीची किंमत १ हजार ५० रुपये आहे. बीडीएन-१३-४१ (गोदावरी) (पांढरी) या वाणाची २ किलोच्या पिशवीची किंमत ३५० रुपये आहे.
ज्वारीमध्ये परभणी शक्ती या जैवसंपृक्त वाण ४ किलो वजनाच्या पिशवीची किंमत ४०० रुपये आहे. मुगाची बीएम-२००३-२ या वाणाची ६ किलोच्या पिशवीची किंमत १ हजार ८० रुपये आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.