Rain Update : परतीच्या पावसाचा कहर

परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनने जळगाव, चोपडा, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव तालुक्यात मोठा फटका बसला. काही भागांत अल्प, तर काही भागात अतिवृष्टी झाली.
Rain Update
Rain UpdateAgrowon

मेहुणबारे, जि.जळगाव ः : परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनने (Monsoon Return Journey) जळगाव, चोपडा, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव तालुक्यात मोठा फटका बसला. काही भागांत अल्प, तर काही भागात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. एकाच दिवसात तालुक्यात तब्बल ३९८ मिलिमीटर पाऊस (Rainfall) झाला.

Rain Update
Crop Damage Compensation : मदतनिधी वितरण रखडले

मेहुणबारे, खडकी आणि तळेगाव मंडळात तर अतिवृष्टी झाली. या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. चाळीसगाव तालुक्यात शुक्रवारी पावसाला सुरवात झाली. दिवसभर मध्यम व जोरदार पाऊस झाला. परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले.

सात मंडळांपैकी तीन मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात तळेगाव मंडळात पावसाने कहर केला. या मंडळात एकाच दिवसात तब्बल ११० मिमि पाऊस झाला. मेहुणबारे मंडळात ७७ मिमि आणि खडकी मंडळात ६८ मिमि अशी अतिवृष्टी झाली.

Rain Update
Rain Update : शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

तर चाळीसगाव मंडळात २२ मिमि, बहाळ मंडळात २४ मिमि, हातले मंडळात ३९ मिमि, शिरसगाव मंडळात ५८ मिमि असा एकूण तालुक्यात ३९८ मिमि इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत ८४४.१८ मिमि पाऊस झाला.

पिकांना फटका

परतीच्या पावसाने गुरुवारी (ता.६), शुक्रवारी (ता.७) कहर केला. त्यामुळे अनेक भागांतील नदी-नाल्यांना पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. परतीच्या तडाख्यामुळे काही भागात काढून ठेवलेली मक्याची कणसे पाण्यात भिजली.

काही दिवसांपासून थांबल्याने व कडक ऊन पडल्याने कपाशी वेचणीची लगबग सुरू होती. मात्र कालच्या परतीच्या पावसाने कपाशीलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जळगाव तालुक्यातही पिंप्राळा, भोकर, नशिराबाद महसूल मंडळात मोठी पिकहानी झाली आहे. पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com