Kharif Season 2023 : गावनिहाय खरीप हंगामाचे सूक्ष्म नियोजन करावे ः भाग्यश्री फरांदे

खरीप हंगामासाठी खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही. प्रत्येक कृषी सहाय्यक यांनी गावनिहाय खरीप हंगामाचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार -फरांदे यांनी दिल्या.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Satara News खरीप हंगामासाठी खतांची (Fertilizer Shortage) कोणतीही कमतरता भासणार नाही. प्रत्येक कृषी सहाय्यक यांनी गावनिहाय खरीप हंगामाचे (Kharif Season) सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार -फरांदे यांनी दिल्या.

खंडाळा तालुक्याची खरीप हंगाम २०२३ च्या नियोजन सभेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, वाई उपविभागीय कृषी अधिकारी तेजदिप ढगे, तालुका कृषी अधिकारी गजानन ननावरे, विलास धायगुडे, वैभव क्षीरसागर, राजेंद्र रासकर, आदी उपस्थित होते.

Kharif Season
Kharif Season : पावसाअभावी देशात लागवड क्षेत्रात घट

खंडाळ्यात बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे संग्राम पाटील, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांनी सोयाबीन व भात या पिकांबद्दल जमीन व्यवस्थापन ते काढणीपश्चात तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र किरणकुमार ओंबासे यांनी खंडाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांना मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र यांनी प्रसारित केलेल्या नवीन वाणाविषयी सविस्तर माहिती दिली.

Kharif Season
Kharif Season : खरिपासाठी सर्व प्रकारच्या ३९ हजार १०३ क्विंटल बियाण्यांची गरज

तालुका कृषी अधिकारी खंडाळा गजानन ननावरे यांनी खरीप हंगाम २०२३ मध्ये खंडाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. दरम्यान, दहिवडी माण तालुक्याची खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण व नियोजन सभा पवार-फरांदे संपन्न झाली.

यावेळी फलटण उपविभागीय कृषी अधिकारी सागर डांगे, तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंगडी. बी. शिंदे, जयदीप बनसोडे, अधिक चव्हाण आदी उपस्थित होते. शेतकरी प्रतिनिधीमधून विश्वंभर बाबर, पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच निविष्ठा विक्रेता प्रतिनिधी मधून श्री. जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com