Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Kharif Sowing : राज्यात खरीप पेरण्या वेगात

जूनमध्ये पावसाचा मोठा खंड होता. महिनाभरात सरासरीच्या फक्त ७१ टक्के पाऊस झाला. त्यामुळे गेल्या हंगामाच्या याच कालवधीच्या तुलनेत सध्या खरीप ज्वारी, तूर, उडीद, भुईमूग आणि सोयाबीनचा पेरा काहीसा पिछाडीवर आहे.

पुणे ः राज्याच्या बहुतेक भागात अधूनमधून भीजपाऊस (Rain) होत आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या (Kharif Sowing) झपाट्याने पुढे सरकत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी खरिपातील सरासरी क्षेत्राच्या (Average Kharif Sowing Area) ४२ टक्क्यांपर्यंत म्हणजेच ६० लाख हेक्टरच्या आसपास पेरा केला आहे.

जूनमध्ये पावसाचा मोठा खंड होता. महिनाभरात सरासरीच्या फक्त ७१ टक्के पाऊस झाला. त्यामुळे गेल्या हंगामाच्या याच कालवधीच्या तुलनेत सध्या खरीप ज्वारी, तूर, उडीद, भुईमूग आणि सोयाबीनचा पेरा काहीसा पिछाडीवर आहे. त्यामुळे ८-१० दिवसांपूर्वीपर्यंत पेरण्या २०-३० टक्क्यांच्या आसपास रेंगाळल्या होत्या. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात भीजपाऊस सुरू असल्यामुळे पेरण्या वेगाने होत आहेत.

Kharif Sowing
पुणे जिल्ह्यात खरिपाच्या अवघ्या सात टक्के पेरण्या

“जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गेल्या हंगामातदेखील पेरण्या याच गतीने चालू होत्या. राज्यात यंदा १४१ लाख हेक्टरच्या पुढे खरिपाचा पेरा होईल. गेल्या हंगामात याच कालवधीत पेरा ५५ लाख हेक्टरपर्यंत गेला होता. यंदा तो ५९ ते ६० लाखाच्या आसपास दिसतो आहे. त्यामुळे पेरण्यांमध्ये प्रगती असून पुढील १०-१२ दिवसांत सर्व भागात पेरण्या शेवटच्या टप्प्यात येतील,” अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

राज्याच्या प्रमुख खरीप पिकांपैकी कपाशीचा पेरा २३ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. हा पेरा सध्या सरासरी क्षेत्राच्या ५७ टक्के इतका दिसतो आहे. तसेच, सोयाबीनचा पेरा ५३ टक्के झाला आहे. पेरणी क्षेत्र २० लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे. तुरीचा पेरा मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत ११ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी याच कालावधीपर्यंत साडेपाच लाख हेक्टरपर्यंत तुरीचा पेरा नेला होता. यंदा तो सध्या ४.९५ लाख हेक्टरपर्यंत आलेला आहे. राज्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र पावणेपाच लाख हेक्टरपर्यंत आहे. त्यापैकी सध्या केवळ ४० हजार हेक्टरचा पेरा झाला असून गेल्या हंगामाच्या तुलनेत तो ३२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे.

राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे म्हणाले, “ २०१४ ते २०२१ पर्यंतच्या खरीप हंगामातील ३० जूनपर्यंतच्या पेऱ्याचा अभ्यास केला असता सरासरी ५० लाख हेक्टरपर्यंत पेरा झाल्याचे दिसते. चालू हंगामात पेरा सध्या ६० लाखापर्यंत गेला आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखी स्थिती नाही.’’

भीजपावसामुळे पेरण्या वेगाने पुढे सरकत आहेत. पावसाअभावी पेरा झालाच नाही, अशी स्थिती आतापर्यंत एकाही जिल्ह्यात उद्भवलेली नाही.
विनयकुमार आवटे, राज्याचे मुख्य सांख्यिक

राज्यात १ जुलैपर्यंतचा खरीप पेरा (आकडे हेक्टरमध्ये) टक्केवारी
पीक- सरासरी क्षेत्र- गेल्या वर्षीचा पेरा-चालू वर्षाचा पेरा-(कंसात) पेरणीची टक्केवारी

धान १४९७४४९---११५२९७---१३१७८५ (९%)
खरीप ज्वारी ४८२४६१---५९८८५---१३२६३३ (८%)
बाजरी ६७१५९५---११४४२१---६३६२६९ (२०%)
नाचणी ९४७३१---४२६३---४६१५ (५%)
मका ८३८०६०---१८१६२७---३२७५४६ (३९%)
तूर १२७५९७१---५५५६१८---४९५४९६ (३९%)
मुग ४८३३४७---११५२६५---१३५५७४ (२८%)
उडीद ३५८९५३---१५६२१३---३८०६१३ (३७%)
भुईमूग १९८४३४---६९४६१---४२८२३ (२२%)
तीळ २३६७२---१४५४---८०७ (३%)
कारळे १९७२७---११५९---३८० (२%)
सूर्यफूल १७९६५---१६१६---३९७० (२२%)
सोयबीन ३८८४६३३---२१५८८५४---२०७६५२६ (५३%)
कापूस ४१८३८०१---१९५८६२५---२३९१५२७ (५७%)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com