Kharif Sowing : पुणे जिल्ह्यात खरीप पेरणीचा टक्का वाढला

यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची वेळेवर पेरणी करण्याचे नियोजन केले होते.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वेगात (Kharif Sowing Increased Due To Good Rain) झाल्या. त्यामुळे पेरणीचा टक्का (Sowing Percentage In Maharashtra) काही प्रमाणात वाढण्यास मदत झाली आहे. पुणे जिल्ह्यात सरासरीच्या एक लाख ९५ हजार ७१० हेक्टरपैकी एक लाख २८ हजार ४३१ हेक्टर म्हणजेच ६६ टक्के पेरण्या झाल्याची नोंद कृषी विभागाकडे (Sowing Data Agriculture Department) झाली आहे.

Kharif Sowing
सोलापुरात दोन लाख ८२ हजार हेक्टरवर खरिप पेरणीचे नियोजन

यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची वेळेवर पेरणी करण्याचे नियोजन केले होते. अनेक शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन खते, बियाणे खरेदी केले. तर काही शेतकऱ्यांनी खासगी बँकेकडून कर्ज घेऊन खरीप हंगामात निविष्ठा खरेदीचे योग्य ते नियोजन केले होते. परंतु जूनचा पहिला आठवडा लोटला तरीही मॉन्सून राज्यात दाखल झालेला नव्हता. अखेर मॉन्सून दाखल झाल्यानंतर कमी अधिक पाऊस बरसला. परंतु पावसाला फारसा जोर नसल्याने शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगाम वाया जातो की काय अशी चिंता वाढली होती. परंतु जून अखेरीस पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यानंतर पावसाला चांगलीच सुरुवात झाली.

Kharif Sowing
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात आजपासून खरिप बियाण्यांची विक्री

यंदा जुलैच्या एक तारखेपासून राज्यासह पुणे जिल्ह्यात पावसाने बरसण्यास सुरुवात केली. नऊ जुलैनंतर पावसाचा काही प्रमाणात जोर वाढल्याने भात खाचरे भरून वाहू लागली. त्याच दरम्यान पूर्व भागातही कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडला. जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीच्या १७६ मिलिमीटरपैकी अवघा ८३ मिलिमीटर म्हणजेच ४७ टक्के पाऊस पडला होता. तर जुलैमध्ये १ ते २२ जुलै दरम्यान सरासरीच्या ३०९ मिलिमीटरपैकी ३९० मिलिमीटर म्हणजेच १२६ टक्के पाऊस पडला.

त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर, मूग, सोयाबीन, बाजरी अशा बियाण्यांची पेरणी करण्यास सुरुवात केली. सध्या भागात पिके वाढीच्या अवस्थेत असून, पिकांची अवस्थाही चांगली आहे. भात पट्ट्यात उशिराने भात लागवडी सुरू झाल्या आहेत. मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिल्याने भात लागवडी वेगाने सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भात लागवडी उरकल्या असून, अधूनमधून संततधार होत असलेल्या पावसामुळे भात पिकांची वाढ चांगली आहे.

पुणे जिल्ह्यात पीकनिहाय झालेली खरिपाची पेरणी, हेक्टरमध्ये :

पीक --- सरासरी क्षेत्र --- पेरणी झालेले क्षेत्र

भात --- ५९,६२७ -- २४,४३४

ज्वारी -- ६०७ -- ०

बाजरी -- ४७,५१८ -- २८,१४४

रागी --- २७९८ -- ११४०

मका --- १८८२८ -- १४७५७

इतर तृणधान्ये -- ८७१ -- २९०

तूर -- २०३३ -- ६५९

मूग -- १४,९६१ -- ७७५१

उडीद -- ९३६९ -- ६२१४

इतर कडधान्ये -- ९३६९ -- ६२१४

भुईमूग -- १५४३२ -- ५२४५

तीळ --- १६६ -- ४३

कारळे -- ६३३ -- १७२

सूर्यफूल -- ९९ -- ११८

सोयाबीन -- २०,९८२ -- ३७९१५

कापूस --- ५० -- ४८९

एकूण -- १,९५,७१० -- १,२८,४३१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com