Kharif Sowing : जळगाव जिल्ह्यात मृग नक्षत्रात खरिपाचा पेरा हुकला

Kharif Season 2023 : या वर्षी उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात आहे. पाऊस हुलकावणी देत आहे. पाऊस नसल्याने मशागती ठप्प आहेत.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Jalgaon News : जिल्ह्यात मृग नक्षत्रावर खरीप हंगामातील पेरण्या केल्या जातात. मात्र मृग नक्षत्र सुरू झाले, तरी पेरण्या झालेल्या नाहीत. या वर्षी उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात आहे. पाऊस हुलकावणी देत आहे.

पाऊस नसल्याने मशागती ठप्प आहेत. यामुळे या वर्षीचा मृग नक्षत्रातील खरिपाचा पेरा हुकला आहे. पावसाच्या आगमनानंतर मशागती होऊन पेरण्या होतील. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडणार आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

या वर्षी जूनचा पहिला आठवडा संपला, तरी पावसाचे आगमन नाही. मागील वर्षी जूनमध्ये खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. दरवर्षी उन्हाळ्यात होत असलेल्या पावसामुळे खरीपपूर्व मशागती होत. या वर्षी उन्हाळी पाऊसही झालाच नाही. मृगावर शेतकरी ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, चवळी, तूर, सूर्यफूल, सोयाबीनची पेरणी करत.

Kharif Sowing
Kharif Sowing 2023 : माॅन्सूनची प्रतिक्षा तरीही खरीप पेरणीचा वाढला वेग

सध्या ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी शेणखताचे शेतात ढीग मारले आहेत. मशागती खोळंबल्या आहेत. काही ठिकाणी पाऊस होईल, या आशेवर खरीप पेरणीपूर्व मशागती करताना दिसत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी कृषी केंद्र ओस पडू लागल्याचे चित्र आहे.

Kharif Sowing
kharif Sowing : पेरणीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना पावसाची आशा

शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते अद्यापही खरेदी केलेली नाहीत. त्यामुळे कृषी दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकरी पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. पाऊस पडल्यानंतरच खरिपाच्या पेरण्या होणार असून, खरीप हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील पिके व सरासरी किंवा अपेक्षित पेरणी क्षेत्र

पिकाचे नाव सरासरी (हेक्टरमध्ये)

ज्वारी खरीप ३२ हजार

बाजरी ९ हजार

मका ७२ हजार

तूर १३ हजार ३००

उडीद २२ हजार १००

मूग २३ हजार ८००

भुईमूग २ हजार

सोयाबीन १८ हजार ३००

कापूस ५ लाख ५० हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com