मराठवाड्यात २७ लाख हेक्टरवर खरिपाची पीक

विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २९ लाख ३५ हजार ८४४ हेक्टर आहे.
Kharif Crop
Kharif CropAgrowon

लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत खरीप हंगामातील (Kharif Season) सरासरी क्षेत्र २९ लाख ३५ हजार ८४४ हेक्टर आहे. त्या तुलनेत २७ लाख ०६ हजार २०५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या ९८ टक्के प्रत्यक्ष पेरणी (Kharif Sowing) झाली आहे.

कृषीच्या अहवालानुसार पीकनिहाय स्थिती

खरीप ज्वारी : लातूर विभागात खरीप ज्वारीचे सरासरी क्षेत्र ९४१७८ हेक्टर असून, आतापर्यंत ३३९२७ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या ३६ टक्के पेरणी झाली आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून, नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडली आहेत. काही प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. लातूर व हिंगोली जिल्ह्यांत काही भागांत पिके पिवळी पडत आहेत. परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यांत पीक परिस्थिती समाधानकारक आहे.

Kharif Crop
Kharif Sowing : भात लागवड क्षेत्रात १३ टक्क्यांची घट

तूर-लातूर विभागात तुरीचे सरासरी क्षेत्र ३४९२५३ हेक्टर असून, आतापर्यंत २५५०७० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली जी सर्वसाधारण क्षेत्राच्या ७३ टक्के आहे. पीक सद्या वाढीच्या अवस्थेत आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडली. परंतु पावसाचा खंड पडल्यामुळे परिस्थिती सुधारत आहे. काही ठिकाणी मर व मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात आढळून येत आहे. लातूर व हिंगोली जिल्ह्यांत काही भागांत पिके पिवळी पडत आहेत. परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यांत पीक परिस्थिती समाधानकारक आहे.

Kharif Crop
Soybean Rate : सोयाबीनला यंदाही चांगला दर मिळणार

मूग-लातूर विभागात मुगाचे सरासरी क्षेत्र ९६८३९ हे.असून, आतापर्यंत ६१०६२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ६३ इतकी आहे. पीक सध्या फ़ुलोरा व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. लातूर व हिंगोली जिल्ह्यांत काही भागांत पिके पिवळी पडली आहेत. परभणी, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांत पीक परिस्थिती समाधानकारक आहे.

उडीद ः लातूर विभागात उडदाचे सरासरी क्षेत्र ९८९२७ हेक्टर असून, आतापर्यंत ७१४८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ७२ इतकी आहे. पीक सध्या फ़ुलोरा व काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून, लातूर व हिंगोली जिल्ह्यांत काही भागात पिके पिवळी पडत आहेत. परभणी, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांत पीकपरिस्थिती समाधानकारक आहे.

सोयाबीन ः लातूर विभागात सोयाबीनचे पिकाचे सरासरी क्षेत्र १५७१८६८ हेक्टर असून, आतापर्यंत १८५५९३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ११८ इतकी आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून लातूर, उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत काही भागांत पिके पिवळी पडत आहेत. नांदेड जिल्ह्यात पावसाने थोडी उघडीप दिल्यामुळे पीकपरिस्थिती सुधारत आहे. परभणी जिल्ह्यात पीकपरिस्थिती समाधानकारक आहे.

कापूस ः लातूर विभागात कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४८५०८८ हेक्टर असून, आतापर्यंत ४०८८३१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी ८४ इतकी आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पिके पिवळी पडली आहेत. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी शंखीगोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे, उपाययोजना बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच नांदेड व परभणी जिल्ह्यांत पिकावर अल्प प्रमाणात तुडतुडे व मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

शंखीगोगलगाईचा व पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव

लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर शंखीगोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी मेटाल्डीहाइड २ किलो/एकरी शेतात पसरून देणे व एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे बाबत क्षेत्रीय स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये मेअखेर व जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या क्षेत्रावर पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी थायमेथोक्झाम अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ४ मिलि किंवा बीटासायफ़्लुथ्रीन अधिक इमिडाक्लोप्रीड ७ मिलि / १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करणे व प्रादुर्भाग्रस्त झाडे नष्ट करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com