
कोल्हापूर : पंचगंगा व इतर नद्यांमधील प्रदूषण (Panchganga River pollution ) वाढून पाण्यातील जीवसृष्टी धोक्यात येत आहे. शिवाय कोल्हापुरातील (Kolhapur) लोकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे.
या प्रकरणी वेळोवेळी निवेदन देऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (Pollution Control Board) दुर्लक्ष झाले आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ नोटीस काढते.
त्यामुळे प्रदूषण करणारे कारखाने, स्थानिक स्वराज्य संस्था निर्ढावलेल्या आहेत, आशा घोषणा देऊन किसान सभेने प्रदूषण मंडळाचा निषेध केला.
विविध अभ्यास संस्था व पर्यावरण तज्ज्ञांनी काढलेल्या निकषानुसार या प्रदूषणास कारखान्यांतून निघणारे रसायन नदीत मिसळणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतून दूषित मैला मिश्रित गटारीचे पाणी मिसळत आहे.
तसेच मासेमारीच्या तंत्रातील त्रुटी याही कारणीभूत आहेत. पंचगंगा व इतर नद्या प्रदूषणास कारणीभूत असलेले कारखाने, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर घटक यांच्यावर कारवाई करावी.
कारखाने व स्थानिक संस्थांच्या वीज तोडणी त्यांच्या अधिकाऱ्यावर गुन्हे करावेत दंड ठोठावून त्यांच्या वैयक्तिक पगारातून तो वसूल करावा, पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नावर श्वेतपत्रिका काढावी.
पंचगंगेतील प्रदूषणमुक्ती अभ्यासासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. जिल्हा किसान सभेचे सचिव नामदेव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गिरीश फोंडे, जिल्हा अध्यक्ष वाय. एन. पाटील, दिनकर सूर्यवंशी, संजय पाटील उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.