‘किसान सभा पुणे जिल्ह्यात मजबूत संघटन निर्माण करणार’

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सरकार गांभिर्याने विचार करत नाही. त्यामुळे किसान सभेच्या माध्यमातून राज्यभर शेतकरी संघर्ष सुरू करण्यात आला आहे.
Kisan Sabha
Kisan SabhaAgrowon

पुणे : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सरकार गांभिर्याने विचार करत नाही. त्यामुळे किसान सभेच्या (Kisan Sabha) माध्यमातून राज्यभर शेतकरी संघर्ष सुरू करण्यात आला आहे. या संघर्षामुळे अनेक शेतकरी लोक जोडले जात आहे. या पुढील काळात पुणे जिल्ह्यात आपण सर्वांनी मिळून मजबूत संघटन निर्माण करूयात, अशी अपेक्षा किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ. किसन गुजर (Kisan Gujar) यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पुणे जिल्हा समितीचे नववे जिल्हा अधिवेशन घोडेगाव येथे बुधवारी (ता. २४) पार पडले. या वेळी किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. नाथा शिंगाडे, ज्येष्ठ कामगार नेते कॉ. अजित अभ्यंकर, माकपा पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे, जनवादी महिला संघटनेच्या हिराबाई घोंगे, अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या राज्यस्तरीय नेत्या शुभा शमीम, एसएफआय संघटनेचे राज्य पदाधिकारी विलास साबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर, घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, सीताराम काळे, वैभव वाळुंज आदी उपस्थित होते. या वेळी किसान सभेचे जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे यांनी मागील सहा वर्षांच्या किसान सभेच्या कार्याचा अहवाल मांडला.

Kisan Sabha
Crop Damage : ऑगस्टमधील नुकसानीचे ४८ टक्के पंचनामे उरकले

किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले म्हणाले, की पुणे जिल्ह्यात हिरडा खरेदी व रास्त भावाचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. याशिवाय दुधाला एफआरपी कायदा लागू करणे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, वनहक्क-पेसा, मनरेगा कायद्याची अंमलबजावणी, निराधार पेन्शन वाढ करा, आदिवासी ठाकर, कातकरी समाजाचे मूलभूत प्रश्‍न असे अनेक प्रश्‍न वारंवार पुढे येत आहे. त्यासाठी सरकारकडून कोणतीही सोडवणूक होत नाही.

येत्या काळात या प्रश्‍नाचे ठराव मान्य करून या प्रश्‍नांवर, पुढील काळात व्यापक लढा उभा करणार आहे. त्यात सर्वांनी सहभागी होण्याची गरज आहे. सध्या राज्यात सर्वच पक्षाकडून सत्तेसाठी वेगळेच राजकारण सुरू झाले आहे. राजकीय व्यक्तींनी राजकारणापेक्षा मूलभूत प्रश्‍नांवर काम करणाऱ्या संघटनांना व पक्षांना पाठबळ द्या, अशी अपेक्षाही व्यक्त केली. अधिवेशनात किसान सभेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अमोल वाघमारे यांनी प्रास्तविक केले. तर राजू घोडे यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com