Kisan Sabha : किसान सभेच्या पायी मोर्चाला अकोल्यातून सुरुवात

Kisan Morcha : नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मूलभूत प्रश्न तीव्र झाले आहेत.
Kisan Sabha
Kisan SabhaAgrowon

Kisan Sabha Update : शेतकरी, आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांच्या सहभागाने बुधवारी (ता. २६) अकोले (जि. नगर) येथून लोणी (जि. नगर) पायी लाँग मार्चला (Farmer March) सुरुवात झाली.

प्रशासनाने परवानगी नाकारली तरी मोर्चेकरी लाँग मार्च काढण्यावर ठाम होते. तीन दिवस चालून शुक्रवारी (ता. २८) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या लोणी येथील घरावर हा मोर्चा जाणार आहे.

Kisan Sabha
Kisan Drone News : दहा पिकांसाठी ड्रोनद्वारे फवारणी कार्यपद्धती निश्‍चित

नैसर्गिक आपत्ती व राज्यात सुरू असलेल्या नीतिभ्रष्ट राजकारणाचा परिणाम म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, कर्मचारी श्रमिकांचे मूलभूत प्रश्न तीव्र झाले आहेत. राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे व विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेले आहेत.

पक्ष फोडण्याची राजकीय आमिषे व तुरुंगाची भीती दाखवून सत्ता मिळविण्यात बहुतांश प्रस्थापित राजकीय नेते व पक्ष मशगुल झाले असल्याने, अखेर पुन्हा एकदा जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणे अनिवार्य झाले आहे. किसान सभेच्या पुढाकाराने या पार्श्‍वभूमीवर २६, २७, २८ एप्रिल रोजी अकोले ते लोणी असा राज्यव्यापी पायी मोर्चा (लाँग मार्च) काढण्याचा किसान सभेने घेतला.

मोर्चा काढण्याला सुरुवातीला परवानगी नाकारली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा करून मागण्या सोडविण्याबाबत सरकार सकारात्मक असून मोर्चा न काढण्याची विनंती केली. पण मोर्चैकरी मोर्चावर ठाम असल्याचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले. बुधवारी सायंकाळी पाच वाजता सभा झाल्यानंतर अकोल्यातून मोर्चाला सुरुवात झाली.

Kisan Sabha
Kisan Sabha : किसान सभेचा उद्या अकोले ते लोणी पायी मोर्चा

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या

- अवकाळी पावसाने उभ्या महाराष्ट्राला झोडपले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी फळबागा मातीमोल झाल्या. आंबा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. ती तातडीने द्यावी.

- गायरान जमीन, दूध धोरण, दूध ‘एफआरफी’ समितीचे न झालेले गठण, दूध आयातीला विरोध.

- दूध, कापूस, सोयाबीन, हिरडा, तूर, हरभरा यांसारख्या पिकांना रास्त भावाची हमी द्या.

- जमीन अधिग्रहणास योग्य मोबदला मिळावा.

- शेतकऱ्यांना व निराधारांना पेन्शन, सर्वांना घरकुले, कर्ज व वीजबिलमाफी, शेतीला सिंचनासाठी धरणांचे पाणी, बांधकाम कामगारांना मेडिक्लेम व घरकुल मिळावे.

- आशा कर्मचारी, आशा सुपरवायझर, अंगणवाडी ताई, पोषण आहार कर्मचारी, अर्धवेळ स्री परिचर, घरेलू कामगार यांचे प्रश्न सोडवा.

- राज्यात मागील दोन हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके संपूर्णपणे बरबाद केली. सरकारने या पिकांच्या नुकसानीची मदत देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र कोठेही मदत करण्यात आली नाही ती तातडीने मिळावी.

- वन जमिनी, देवस्थान, इनाम, वक्फ, वरकस, आकारीपड, गायरान व घरांच्या तळ जमिनी, नावे व्हावीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com