‘शेती मिशन’च्या अध्यक्षपदावरून किशोर तिवारी यांची हकालपट्टी

(कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहित शेतकरी आत्महत्यांच्या विषयात दखल देण्याची मागणी केली होती.
किशोर तिवारी
किशोर तिवारीAgrowon

नागपूर : (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहित शेतकरी आत्महत्यांच्या विषयात दखल देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर तडकाफडकी त्यांची मिशनच्या अध्यक्षपदावरुन हटविण्याची कारवाई करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केंद्र व राज्य सरकारच्या शेती विषयक धोरणाला कंटाळात त्याच दिवशी आत्महत्या केली होती. आत्महत्या पूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये थेट पंतप्रधानांवर आरोप केले होते. ‘मोदी साहेब तुम्हाला तुमचं पडलं आहे. मात्र शेती विषयक कोणतेच धोरण नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. याचा विसर आपणास पडला आहे’, अशी खंत केदारी यांनी चिठ्ठीतून व्यक्त केली होती.

किशोर तिवारी
Natural Farming : नैसर्गिक शेती आणि मातीतले खनिज घटक

या चिठ्ठीचा आधार घेत तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात गेल्या आठ वर्षांत पंतप्रधान म्हणून आपण समर्थपणे जबाबदारी पार पाडल्याचे नमूद करीत तिवारी यांनी भ्रष्ट यंत्रणांमुळेच शेतीविषयक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे म्हटले होते. या साऱ्या घडामोडीनंतर राजकीय क्षेत्र ढवळून निघाले होते. त्यानंतरच्या घटनाक्रमात राज्य सरकारने तडकाफडकी आदेश ‘मिशन’च्या अध्यक्षपदावरून तिवारी यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले.

दशरथ केदारी यांच्या आत्महत्येनंतर तर वेगळीच वास्तविकता समोर आली. सुपीक प्रदेशात ही आत्महत्या झाली होती. याची पंतप्रधानांनी दखल घ्यावी. या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पुणे जिल्ह्याला भेट द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर थेट मला या पदावरून हटविण्यात आले.

- किशोर तिवारी, माजी अध्यक्ष,

(कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन.

किशोर तिवारी
Crop Damage : शेतात मातीच उरली नाही, शेती करू कशी?

प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आनंद

किशोर तिवारी हे शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष म्हणून आढावा बैठक घेत होते. या बैठकीत त्यांच्याकडून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली जात होती. अनेकदा या विरोधात अधिकारी-कर्मचारी संघटनांनी आंदोलने केली होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com