Crop Damage:आंबेगावच्या बढेकर मळ्यात ३० एकरात गुडघाभर पाणी

शेतातील गवार, टोमॅटो, सोयाबीन (Soybean), भुईमूग (Ground nut), जनावरांचा हिरवा चारा ही उभी पिके (Crop Damage) अक्षरशः सडू लागली आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon

पारगाव, जि. पुणेः आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात शुक्रवारी (ता.२९) पहाटे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे बढेकर मळ्यातील सुमारे ३० एकर शेतात गुडघाभर पाणी साचले. शेतातील गवार, टोमॅटो, सोयाबीन (Soybean), भुईमूग (Ground nut), जनावरांचा हिरवा चारा ही उभी पिके (Crop Damage) अक्षरशः सडू लागली आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

धामणी परिसर कमी पर्जन्याचा आहे. येथे दरवर्षी अत्यल्प पाऊस होतो. तीन वर्षांतून कधीतरी या भागात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना पूर येतात. शेतात पाणी साचून पिकांचे, शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

Crop Damage
Cow Urine: छत्तीसगड सरकार करणार गोमूत्राचीही खरेदी

शुक्रवारी (ता.२९) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ढगफुटीसदृश्य पाऊस झाला ओढ्या-नाल्यांना पूर आला. त्यामुळे सुमारे १५ ते २० शेतकऱ्यांच्या धामणी खिंडीत डोंगराच्या शेजारी असलेल्या सुमारे ३० एकर शेतात गुडघाभर पाणी साचले.

शेताचे बांध वाहून गेले. शेतातील गवार, टोमॅटो, सोयाबीन, भुईमूग ही पिके पाण्यात तरंगत आहेत. पिके सडू लागल्याने संबोधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केरभाऊ बढेकर, संजय बढेकर, नवनाथ बढेकर, संतोष बढेकर, अशोक बढेकर, अशोक जाधव आदी शेतकऱ्यांनी केली.

शासनाने संबंधित नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.

सागर जाधव, सरपंच.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com