
Pune News: आपल्या प्रॉडक्टचे दमदार मार्केटिंग होण्यासाठी त्याचे पॅकिंगही तेवढेच आकर्षक पाहिजे. कारण उत्तम पॅकिंग केलेल्या प्रॉडक्टसला ग्राहकांकडून वाढती मागणी आहे. यामुळे पॅकिंग मटेरिअलच्या वापरातही २०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
अशा या भरपूर डिमांड असलेल्या व्यवसायाबाबत तसेच पॅकिंगसाठी (Packaging) जे मटेरिअल लागते ते कसे बनवितात, त्यासाठी कोणती अद्ययावत यंत्रे लागतात, छोटे पॅकेजिंग युनिट कसे सुरू करावे आदी विषयी सखोल माहिती करून देणारा ४ विकेंडचा सर्टिफिकेट कोर्स २५ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान ‘सकाळ ॲग्रोवन’संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’तर्फे पुण्यात आयोजिला आहे.
कोर्समधील विषयः
- पॅकेजिंग तंत्रज्ञानाची ओळख
- विविध पॅकेजिंग मटेरिअल
- पॅकेजिंगचे घटक
- इंडस्ट्रीनिहाय पॅकेजिंग
- पॅकिंग मटेरिअल बनविण्याची पद्धती
- आवश्यक यंत्रसामग्री
या विषयांतील नामवंत सल्लागार व ‘ॲग्रोवन’चे लेखक शैलेश जयवंत हे मार्गदर्शन करतील. ज्यांना पॅकेजिंगमध्ये स्टार्टअप करायचे आहे.
तसेच पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे आदींसाठी हा कोर्स फायदेशीर आहे. प्रतिव्यक्ती १६ हजार ५०० रुपये शुल्क आहे.
२१ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी केल्यास शुल्कात दीड हजार रुपये सवलत मिळेल. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.