
पुणे ः शेतीबांधांवरील प्रयोगशाळा ही संकल्पना जोमाने वेग घेऊ लागली आहे. याद्वारे महागड्या निविष्ठा शेतकरी आता स्वतःच्या शेतबांधावर तेही अतिशय कमी खर्चात तयार करून पिकांना वापरून अधिक दर्जेदार उत्पादन घेऊ शकतात. अनेक शेतकरी, शेतकरी गट ही संकल्पना आपल्या शेतात राबवून त्याचे उत्कृष्ट परिणाम अनुभवत आहेत. अशा या फायदेशीर ठरणाऱ्या शेतबांधावरची प्रयोगशाळा व त्याद्वारे जैविक व सेंद्रिय खतनिविष्ठा तयार करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारी एकदिवसीय विशेष कार्यशाळा ‘सकाळ ॲग्रोवन’संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ (SIILC) तर्फे रविवारी (ता. ८ जानेवारी ) पुण्यात आयोजिली आहे.
कार्यशाळेत नैसर्गिक निविष्ठा आपल्या शेतात कशा तयार कराव्या, सी विड, पोटॅशिअम हुमेट, निम/करंज तेल वापरून दाणेदार खत कसे तयार करावे आदींविषयी मार्गदर्शन होईल. जेवण, चहा, प्रमाणपत्रासह प्रति व्यक्ती १५०० रुपये शुल्क आहे. ४ जानेवारीपर्यंत नोंदणी केल्यास ३०० रुपये सवलत मिळेल. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१
काय शिकणार कार्यशाळेत?
- सूक्ष्म-जीव व जैविक अर्काचे विविध पिकांसाठी महत्त्व
- ट्रायकोडर्मा व मेटारायझियम बुरशींचे महत्त्व
- शेतबांधावर कमी खर्चात प्रयोगशाळा कशी उभारावी
- आजवर उभारलेल्या शेतबांधावरील प्रयोगशाळांची माहिती
ः- जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा पिके, जमीन व पाण्याची प्रत सुधारण्यासाठी उपयोग
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.