
Sindhudurg News : ‘‘कोकणाचा सर्वांगीण विकास (Konkan Development) करण्यासाठी कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येईल,’’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीचे (Bharadidevi) दर्शन घेतले.
त्यानंतर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार रवींद्र फाटक, राजन तेली आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘‘‘एमएमआरडीए’च्या धर्तीवर एमआयडीसी, सिडको व एमएसआरडीसी यांना सोबत घेऊन कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरण करण्यात येईल. कोकणाला त्याचा खूप फायदा होईल. हे प्राधिकरण अतिशय महत्त्वाचे आहे.
सागरी महामार्ग हा कोकणच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचेही काम हातामध्ये घेत आहोत. त्यांचे रुंदीकरण करण्याचा काम आपण करणार आहोत. जेणेकरून, कोकणच्या पर्यटनाला चालना मिळेल. सागर किनाऱ्यांच्या सुशोभीकरणावर भर दिला जाईल.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ग्रीनफिल्ड रस्ता मुंबई- सिंधुदुर्ग फास्टट्रॅक कंट्रोल याचे देखील काम हाती घेतले जाईल. त्यामुळे प्रदूषण कमी होईल व लोकांचा वेळ वाचेल. विकासाला चालना मिळेल. विकासाची दारे खुली होतील.’’
‘‘पर्यटन व मत्स्य व्यवसायालाही मोठा वाव आहे. पावसाचे वाहून जाणाऱ्या पाण्याचा संचय करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन प्रकारचे प्रकल्प केले पाहिजेत. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देखील राज्य शासन देत आहे. शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीची जोड देणे आवश्यक आहे,’’ असेही शिंदे म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.