Manikrao Khule : माणिकराव खुळे यांना कृषिमित्र प्रेरणा पुरस्कार

पुणे येथील हवामान विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर श्री. खुळे हे शेतकऱ्यांना सातत्याने हवामानविषयी माहिती देत आहेत. शेतकरी हितासाठीच्या केलेल्या कार्याकरिता ग्रुपच्या वतीने श्री. खुळे यांचा गौरव करण्यात आला.
amnikrao Khule
amnikrao KhuleAgrowon

नाशिक : येथील कृषिमित्र ग्रुपच्या (Krushimitra Group) वतीने ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांना ‘कृषिमित्र प्रेरणा पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील हवामान विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर श्री. खुळे हे शेतकऱ्यांना सातत्याने हवामानविषयी (Weather Update) माहिती देत आहेत. शेतकरी हितासाठीच्या केलेल्या कार्याकरिता ग्रुपच्या वतीने श्री. खुळे यांचा गौरव करण्यात आला.

amnikrao Khule
Agriculture Irrigation : माळशिरसमध्ये ‘नीरे’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, वाईनरी, गूळ, पोल्ट्री खाद्य उद्योजक, व्यापाऱ्यांनी एकत्र येत कृषिमित्र ग्रुप स्थापना केली आहे. कुंदेवाडी, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात झालेल्या ग्रुपच्या वार्षिक स्नेह संमेलनात पार्वती ट्रेडिंग कंपनीचे व्यवस्थापक मदन शिंदे यांच्या हस्ते श्री. खुळे यांचा सन्मान करण्यात आला. स्व. मिथिलेश गणेश सिंह यांच्या स्मरणार्थ अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नाशिक विभागाचे कृषी सहसंचालक मोहन वाघ अध्यक्षस्थानी होते. ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील, गहू संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश दोडके, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, कुंदेवाडीचे सरपंच वैकुंठ पाटील, आनंद अॅग्रो उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्धव अहिरे, स्वप्नील अॅग्रो कंपनीचे अरुण पवार, सुधाकर मोगल, शंकरराव ढिकले, निवृत्ती न्याहारकर, योगेश रायते, सदूभाऊ शेळके, धोंडिराम रायते, दर्शन केंगे, दत्ता ढगे, भारत पिंगळे आदी याप्रसंगी उपस्थित होते. भूषण निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सचिन वाघ यांनी आभार मानले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com